नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘AI समिट 2026’ दरम्यान यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या शर्टलेस आंदोलनामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. समिटच्या पाचव्या दिवशी (शुक्रवारी) घडलेल्या या प्रकारावर शनिवारीही देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
चार कार्यकर्ते पोलिस रिमांडवर
या प्रकरणात चार आंदोलनकर्त्यांना पाच दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठवण्यात आले आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपकडून या शर्टलेस आंदोलनाचा तीव्र निषेध करण्यात येत असून, विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनीही आंदोलनाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
मायावतींची तीव्र टीका
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या (BSP) प्रमुख मायावती यांनी शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या आंदोलनावर टीका केली.त्या म्हणाल्या, दिल्लीतील ‘AI इम्पॅक्ट समिट’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम होता. देश-विदेशातील मान्यवर उपस्थित असताना काही लोकांनी अर्धनग्न निषेध व्यक्त करणे अत्यंत अशोभनीय आणि निंदनीय आहे.
देशाची प्रतिमा मलीन होऊ नये
मायावती पुढे म्हणाल्या, जर हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय नसता, तर वेगळी बाब होती. मात्र अशा जागतिक समिटमध्ये असे वर्तन चिंताजनक आहे. देशाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा बिघडू नये, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. मायावतींच्या या वक्तव्यावर यूथ काँग्रेसने प्रत्युत्तर देत, आपण भाजपसाठी बॅटिंग करत राहा, देशासाठी लढा आम्ही लढू, असे म्हटले.
जगन मोहन रेड्डी यांची नाराजी
YSR काँग्रेस पार्टीचे नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, AI समिटमध्ये यूथ काँग्रेसच्या आंदोलनामुळे सर्वांना लाज वाटली. आपली राजकारणाची दिशा कुठे चालली आहे? कोणालाही आपल्या देशाची मान खाली घालण्याचा अधिकार नाही. राजकीय मतभेद काहीही असोत, जागतिक स्तरावर आपल्याला एकत्र उभे राहिले पाहिजे.
KTR यांची निराशा
भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि माजी मंत्री के. टी. रामाराव (KTR) यांनीही सोशल मीडियावर या आंदोलनावर टीका केली. ते म्हणाले, यूथ काँग्रेसने AI इम्पॅक्ट समिटसारख्या जागतिक व्यासपीठाचा वापर किरकोळ राजकीय नौटंकीसाठी केला, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब होऊ शकते.
लोकेश नारांचा इशारा
आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलगू देशम पार्टीचे महासचिव आणि मंत्री लोकेश नारा यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, AI समिट हा भारताला उदयोन्मुख AI महासत्ता म्हणून सादर करण्याचा मंच होता. अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाला राजकीय तमाशात बदलल्याने जगासमोर आपल्या देशाची सामूहिक प्रतिष्ठा कमी होते.
Web Summary : Youth Congress's shirtless protest at the AI Summit draws widespread condemnation. Leaders across party lines criticize the demonstration's impact on India's global image. Four protesters are in police custody.
Web Summary : एआई शिखर सम्मेलन में यूथ कांग्रेस के शर्टलेस विरोध की व्यापक निंदा। विभिन्न दलों के नेताओं ने भारत की वैश्विक छवि पर प्रदर्शन के प्रभाव की आलोचना की। चार प्रदर्शनकारी पुलिस हिरासत में हैं।