Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:20 IST2025-06-12T19:19:38+5:302025-06-12T19:20:32+5:30
Ahmedabad Plane Crash And Vijay Rupani : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील याच विमानात होते. ते लंडनमधील त्यांच्या मुलीच्या घरी जात होते.

Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या दुःखद अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २०४ जणांचे मृतदेह सापडले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील याच विमानात होते. ते लंडनमधील त्यांच्या मुलीच्या घरी जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, विजय रुपाणी यांच्या पत्नी अंजली रुपाणी गेल्या अनेक दिवसांपासून लंडनमध्ये होत्या आणि आता ते देखील त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते.
विमान अपघाताची माहिती मिळताच विजय रुपाणी यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. शेजाऱ्यांनी त्यांच्या घराजवळील मंदिरात पूजा आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. सध्या रुपाणी कुटुंबाकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यांच्या घरात कोणीही उपस्थित नाही.
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबरhttps://t.co/vnHDt7iL6G
— Lokmat (@lokmat) June 12, 2025
अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २०४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर ४१ जण जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे आणि ढिगाऱ्यात आणखी लोक अडकण्याची शक्यता आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांकडून डीएनए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जेणेकरून त्यांची ओळख पटेल.
"माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कुटुंबीय रुग्णालयात धावत आले. गुजरातच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले पूनम पटेल म्हणाले की, "माझी वहिनी लंडनला जात होती. एका तासातच मला विमान अपघात झाल्याची बातमी समजली. म्हणूनच मी येथे आलो आहे. तिला बघायलाही अजून मिळालेलं नाही. त्यामुळे काही समजत नाही."
भावना पटेल यांनी "माझी बहीण लंडनला जात होती. तिची फ्लाईट दुपारी १.१० वाजता होती. याच फ्लाईटचा अपघात झाला." तसेच "माझा मुलगा लंच ब्रेक दरम्यान हॉस्टेलमध्ये गेला होता. तेव्हाच तिथे विमान कोसळलं. माझा मुलगा सुरक्षित आहे आणि मी त्याच्याशी बोललो आहे. त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली, त्यामुळे त्याला दुखापत झाली आहे" असं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या रमिला यांनी सांगितलं.
#WATCH | Air India plane crash: "My son had gone to the hostel during lunch break, and the plane crashed there. My son is safe, and I have spoken to him. He jumped from the second floor, so he suffered some injuries,” says Ramila, who reached the civil hospital in Ahmedabad,… pic.twitter.com/MgMtvXBSou
— ANI (@ANI) June 12, 2025