शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 20:02 IST

Ahmedabad Air India Plane Crash news in Marathi: पाच डॉक्टरांचे मृतदेह सापडल्याचे सांगितले जात आहे, परंतू, विमानाच्या प्रवाशांच्या संख्येपेक्षा जास्त असलेले मृतदेह कोणाचे आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

अहमदाबादमधीलएअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर अपघात स्थळावरून आतापर्यंत २७० जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये विमानातील प्रवासी आणि बीजे मेडिकल कॉलेजचे इंटर्न ड़ॉक्टरही आहेत. या बहुतांश मृतदेहांची डीएनए टेस्ट करण्यात आली आहे. यापैकी ७ जणांचे डीएनए त्यांच्या नातेवाईकांशी जुळले असून हे मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. 

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. विमानामध्ये ४४२ जण होते. पैकी एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. यामुळे सुमारे २४१ प्रवासी आणि हॉस्टेलमधील इंटर्न डॉक्टर असे मिळून २७० मृतदेह आहेत. पाच डॉक्टरांचे मृतदेह सापडल्याचे सांगितले जात आहे, परंतू, विमानाच्या प्रवाशांच्या संख्येपेक्षा जास्त असलेले मृतदेह कोणाचे आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अपघातावेळी हॉस्टेलच्या मेसमध्ये ५० हून अधिक लोक होते, असे सांगितले गेले आहे. 

जसेजसे मृतांचे नातेवाईक पोहोचले आहेत, तसे डीएनए टेस्ट केले जात आहेत. परदेशातील प्रवाशांचे देखील नातेवाईक अहमदाबादला पोहोचले आहेत. त्यांचेही डीएनए सॅम्पल घेतले जात आहेत. येत्या काही दिवसांत सर्व मृतदेहांची ओळख पटण्याची अपेक्षा आहे. यानंतर मृतांचा खरा अधिकृत आकडा जाहीर केला जाणार आहे. 

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २७० हून अधिक मृतदेहांचे पोस्टमार्टेम झाले आहे. यापैकी २२० मृतदेहांचे डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहेत. सात मृतदेहांची ओळख पटल्याचे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे. विमान अपघात प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) सह ८ एजन्सींनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

या अपघातात युकेचे देखील प्रवासी मोठ्या संख्येने असल्याने तेथील तपास यंत्रणा देखील भारतात दाखल झाल्या आहेत. यामध्ये युनायटेड किंग्डमची हवाई अपघात चौकशी शाखा (UK-AAIB), युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB), फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) यांचा समावेश आहे.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादVijay Rupaniविजय रूपाणी