१५ वर्षांत प्रथमच क्रॅश झाले बोइंग ७८७, लांब उड्डाणांसाठी एअर इंडियाने केले होते खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:21 IST2025-06-13T12:21:10+5:302025-06-13T12:21:50+5:30

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबाद येथे दुर्घटनाग्रस्त झालेले बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमान हे एक अत्याधुनिक विमान असून, डिसेंबर २०१३मध्ये बोइंग ‘कमर्शिअल एअरप्लेन्स’ने ते बनवले होते. बोइंग ७८७ विमानाच्या १५ वर्षांच्या इतिहासातील हा पहिलाच अपघात आहे. अपघातग्रस्त विमानाची इत्यंभूत माहिती खालीलप्रमाणे आहे.  

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : Boeing 787 crashes for the first time in 15 years, Air India had purchased it for long flights | १५ वर्षांत प्रथमच क्रॅश झाले बोइंग ७८७, लांब उड्डाणांसाठी एअर इंडियाने केले होते खरेदी

१५ वर्षांत प्रथमच क्रॅश झाले बोइंग ७८७, लांब उड्डाणांसाठी एअर इंडियाने केले होते खरेदी

 
नवी दिल्ली : अहमदाबाद येथे दुर्घटनाग्रस्त झालेले बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमान हे एक अत्याधुनिक विमान असून, डिसेंबर २०१३मध्ये बोइंग ‘कमर्शिअल एअरप्लेन्स’ने ते बनवले होते. बोइंग ७८७ विमानाच्या १५ वर्षांच्या इतिहासातील हा पहिलाच अपघात आहे. अपघातग्रस्त विमानाची इत्यंभूत माहिती खालीलप्रमाणे आहे.  

बोइंग ७८७ ड्रीमलाइनर  नेमके आहे तरी कसे?
बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर हे बोइंगने बनवलेले एक आधुनिक, मध्यम आकाराचे, जुळे इंजिन असलेले, रुंद-बॉडी जेट विमान आहे. ते लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी डिझाइन केलेले आहे आणि जुन्या बोइंग ७६७ ची जागा घेण्यासाठी ते तयार केले आहे. हे इंधन-कार्यक्षम विमान आहे.

विमानाचा इतिहास काय?
बोइंगने २००३मध्ये ‘७ ई ७’ प्रकल्पांतर्गत त्याची निर्मिती सुरू केली होती. नंतर याला ५ लाख ऑनलाइन मतांनंतर ड्रीमलाइनर असे नाव देण्यात आले.
पहिले उड्डाण २००९ मध्ये झाले आणि पहिले विमान २०११ मध्ये एएनएला देण्यात आले. सुरुवातीला काही विलंब झाला होता, परंतु आता ते जगभरात लोकप्रिय आहे. १५ वर्षांच्या इतिहासात हे विमान पहिल्यांदाच क्रॅश झाले आहे. यापूर्वी लिथियम आयन बॅटरीमध्ये आग आणि बॉडीच्या सांध्यामध्ये अंतर अशा तक्रारी आल्या होत्या.

किती इंधन वाचवते?
बोइंग ७८७-८ हे विमान बोइंग ७६७ सारख्या विमानांच्या तुलनेत २० ते २५ टक्के इंधन वाचवते. 

खास वैशिष्ट्य काय?
विमानाचा ५० टक्के हिस्सा कार्बन फायबरचा बनलेला असतो. त्यामुळे ते हलके आहे. 
ड्रीमलाइनरच्या खिडक्या आकाराने सर्वांत मोठ्या २७X४७ सें.मी. आहेत.
केबिन प्रेशर १,९०० मीटर उंचीसारखे ठेवले जाते. त्यामुळे प्रवाशांना ८ टक्के जास्त ऑक्सिजन मिळतो.
 केबिनमध्ये रंग बदलणारी एलईडी लायटिंग आहे. टाइम झोन बदलाचा परिणाम त्यामुळे कमी होतो.
ओव्हरहेड बिन्समध्ये प्रत्येक प्रवाशाची रोल-अबोर्ड बॅग सहजपणे बसते. 

भारताशी संबंध काय?
भारतात ‘एअर इंडिया’ याचा वापर करते. २०१२मध्ये एअर इंडियाने साउथ कॅरोलिना प्रकल्पातून पहिले ७८७-८ विमान घेतले होते. ते दिल्ली-न्यूयॉर्क, मुंबई-लंडन अशा दीर्घ मार्गांवर उडते.

पल्ला - प्रवासी क्षमता किती?
हे विमान २०० ते २५० प्रवासी वाहून नेऊ शकते. एकदा आकाशात झेपावल्यानंतर सलग १४ हजार किलोमीटर उडू शकते. दिल्लीहून न्यूयॉर्कला अथवा टोकिओला एका उड्डाणात जाऊ शकते.

इंजिनाचा परफाॅर्मन्स कसा ?
विमानात रोल्स-रॉयस ट्रेंट १००० अथवा जनरल इलेक्ट्रिक जीईएनएक्सची २ विमाने असतात. ते ६० टक्के कमी गोंगाट करतात.

प्रवाशांसाठी सुविधा काय?
एअरलाइन्सच्या हिशेबाने वेगवेगळे लेआऊट कंपनी देते. ‘एनएनए’मध्ये ३२ बिझनेस, १४ प्रीमियम इकॉनॉमी आणि १३८ इकॉनॉमी आसने आहेत.
प्रवाशास वैयक्तिक टीव्ही, यूएसबी चार्जिंग पोर्ट्स आणि पाॅवर आउटलेट्स मिळतात. आवाज कमी असल्यामुळे शांत प्रवास होतो. आसने आरामदायक आहेत.

पर्यावरणासाठी किती चांगले?
२० ते २५ टक्के कमी इंधन खर्च करते, ५० टक्के कमी कार्बनडायॉक्साईड उत्सर्जन
करते व इंजिनाचा आवाज ६० टक्के कमी होतो. त्यामुळे पर्यावरणासाठी ते सर्वोत्तम मानले जाते.

उणिवा काय आहेत?
काही प्रवाशांना इकॉनॉमी आसने (३-३-३ लेआउट) थोडी अरुंद वाटतात. २०१३मध्ये बॅटरी समस्येमुळे विमाने काही काळ जमिनीवर आणली गेली होती. 

विमाने जसजशी जुनी होतील, तसतसे अपघात वाढतील
या विमानात तांत्रिक बिघाड होण्याच्या घटनांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याची काही उदाहरणे गेल्या काही दिवसांत घडली आहेत. बोइंग कंपनीतील अभियंता सॅम सालेहपूर यांनी नुकताच असा आरोप केला होता की, बोइंगने ७७७ आणि ७८७ ड्रीमलाइनर विमानांच्या उत्पादनात शॉर्टकट्स घेतले. त्यामुळे ही विमाने जसजशी जुनी होतील, तसतसे त्यांच्यात मोठे तांत्रिक बिघाड होण्याचा तसेच त्यांना मोठा अपघात होण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. 

Web Title: Ahmedabad Air India Flight AI171 Crash : Boeing 787 crashes for the first time in 15 years, Air India had purchased it for long flights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.