शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

राजस्थानात भाजपा बॅकफूटवर?; फुटीच्या भीतीनं आमदार गुजरातेमध्ये हलवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 06:50 IST

राजकीय संकट; सरकार वाचविण्यासाठी अशोक गेहलोत प्रयत्नशील

जयपूर : राजस्थान विधानसभेचे अधिवेशन तोंडावर आलेले असतानाच भाजपने आपले काही आमदार शेजारील गुजरात राज्यात हलविले आहेत. आपले आमदार फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून केला जाऊ शकतो, अशी शक्यता वाटल्याने भाजपने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले.सचिन पायलट यांनी आपल्या समर्थक आमदारांसह काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे राजस्थानात राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेहलोत यांचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील असतानाच गेहलोत यांच्याकडूनही आपले सरकार वाचविण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत.बसपाच्या सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशास राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यावर ११ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.हे आमदार अपात्र ठरल्यास भाजपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न गेहलोत सरकारकडून केला जाऊ शकतो, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे आपले आमदार गुजरातेत हलविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.सूत्रांनी सांगितले की, उदयपूर येथील पाच भाजप आमदारांना गुजरातेत हलविण्यात आले आहे. त्यात सलुंबरचे आमदार अमृतलाल मीना, झाडोलचे आमदार बाबुलाल खराडी, मावळीचे आमदार धर्मनारायण जोशी, उदयपूर ग्रामीणचे आमदार फूलसिंग मीना आणि गोगुंडाचे आमदार प्रताप गामेटी यांचा समावेश आहे. ज्येष्ठ भाजप नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांना मात्र गुजरातला हलविण्यात आलेले नाही.वसुंधरा राजे जयपुरात नसल्याने आश्चर्यराजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे दोन दिवसांपूर्वी ढोलपूरहून दिल्लीला गेल्या आहेत. त्यांनी वरिष्ठ भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्याचे मानले जात आहे.गेहलोत सरकार गंभीर राजकीय संकटात असताना वसुंधरा राजे यांची जयपुरातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या महिन्यांत वरिष्ठ भाजप नेत्यांनी जयपुरात बैठका घेतल्या, तेव्हाही वसुंधरा राजे अनुपस्थित होत्या.१४ आॅगस्टपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. अशोक गेहलोत यांनी आपल्या समर्थक आमदारांना जयपूरहून जैसलमेर जिल्ह्यातील सूर्यगढ हॉटेलात हलविले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपाAshok Gahlotअशोक गहलोत