कृषी सभापती ऑन व्हिल

By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:32+5:302015-07-15T23:12:32+5:30

कामधेनू योजनेची घेणार शिबिरे

Agricultural Chairperson on Wheel | कृषी सभापती ऑन व्हिल

कृषी सभापती ऑन व्हिल

मधेनू योजनेची घेणार शिबिरे
नाशिक : कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी सभापती ऑन कॉल उपक्रम राबविल्यानंतर आता तालुकानिहाय आढावा बैठका घेऊन शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्याचा निर्णय घेतला असून, शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ठरणारी कामधेनू योजना पुन्हा कार्यान्वित करून योजनेंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी सभापती केदा अहेर २७ जुलैपासून तालुकानिहाय कामधेनू योजनेच्या शिबिरांचे आयोजन करणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांत ही कामधेनू योजना राबविण्यात येणार आहे. त्यात २७ जुलै रोजी ओढा (नाशिक), ३० जुलैला जयदर (कळवण), ३१ जुलैला कंधाने (बागलाण), १ ऑगस्टला रामेश्वर (देवळा), ७ ऑगस्टला दुगाव (चांदवड) व १० ऑगस्टला सौंदाणे (मालेगाव) येथे कामधेनू योजनेंतर्गत पशुपालक मंडळामार्फत जनावरांचे कार्यमोहीम शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या कामधेनू योजनेत स्थानिक जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनाही आमंत्रित करण्यात येणार असून, तालुकानिहाय राबविण्यात येणार्‍या या कामधेनू योजनेचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी केले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Agricultural Chairperson on Wheel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.