शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

'अग्निपथ'वरून वाद; BJP-JDU युती राहणार की तुटणार? भाजप नेत्याचं जेडीयूला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 21:22 IST

अग्निपथ योजनेवरून जेडीयू आणि प्रमुख मित्रपक्ष असलेला भाजप यांच्यातील दुरावा वाढताना दिसत आहे. दोन्ही पक्षांतील नेते राज्यातील सुशासनावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत...

केंद्राच्या अग्निपथ योजनेवरून बिहारमधील वातावरण जबरदस्त तापले आहे. यामुळे नितीश कुमार यांचा जेडीयू आणि प्रमुख मित्रपक्ष असलेला भाजप यांच्यातील दुरावाही वाढताना दिसत आहे. दोन्ही पक्षांतील नेते राज्यातील सुशासनावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. भाजप अध्यक्ष संजय कुमार जायसवाल यांच्यानंतर, नीतीश कॅबिनेट मधील मंत्री आणि भाजप नेते नीरज कुमार सिंह बबलू यांनीही जेडीयूच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी जेडीयू नेत्यांना युतीतून बाहेर पडण्याचेही आव्हान दिले आहे. 

भाजपनं जेडीयूवर केले आहेत असे आरोप - बिहारमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान, भाजप नेत्यांच्या घरांनाही लक्ष्य करण्यात् आले होते. भाजपच्या अनेक नेत्यांच्या घरांवर आंदोलकांनी हल्ले केले. यानंतर केंद्राने भाजपच्या 10 नेत्यांना Y दर्जाची सुरक्षा दिली. भाजप अध्यक्ष संजयकुमार जायस्वाल यांनी निदर्शने आणि हिंसक घटनांसंदर्भात बोलताना, हे बिहार पोलिसांचे अपयश आहे, असे म्हटले होते.

जेडीयूचा भाजपवर पलटवार - संजय जायस्वाल यांच्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी जेडीयूचे प्रवक्ते आणि एमएलसी नीरज कुमार पलटवार करत म्हणाले होते, की यूपीमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अग्निपथ भरती योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांवर बुलडोझर का चालवले नाही? अलिगडमध्ये पोलीस ठाणे पेटवणाऱ्या आंदोलकांवर कडक कारवाई का केली गेली नाही? 

तसेच, रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, ही प्रामुख्याने रेल्वे संरक्षण दलाची (आरपीएफ) जबाबदारी आहे, जे केंद्राच्या अखत्यारीत येते. आरपीएफने आंदोलनाच्या नावावर नष्ट करण्यात आलेल्या आणि लुटण्यात आलेल्या रेल्वेच्या संपत्तीचे संरक्षण करायला हवे होते. भाजपचे पदाधिकारी आरपीएफच्या अपयशासंदर्भात का बोलत नाहीत? असा प्रश्नही नीरज कुमार यांनी केला होता.

भाजप नेत्याचे जेडीयूला आव्हान -जेडीयू प्रवक्त्यांच्या नाराजीचा उल्लेख करत, भाजप नेते मंत्री बबलू म्हणाले, त्यांचे (जेडीयू नेते) पाय पकडून, त्यांना युतीत राहण्यासाठी कुणीही थांबवले नाही. जर काही लोकांनी कुठल्या ना कुठल्या बहान्याने एनडीएतून बाहेर जाण्याचे ठरवलेच असले, तर ते पुढे जाऊ शकतात. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्षांनी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात पोलिसांच्या अपयशावर बोट ठेवले, तर त्यात चूक काय होते? असेही बबलू म्हणाले.

 

टॅग्स :BJPभाजपाAgneepath Schemeअग्निपथ योजनाBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार