शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
3
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
4
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
5
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
6
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
7
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
8
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
9
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
10
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
11
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
12
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
13
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
14
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
15
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
16
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
17
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
18
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
19
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
20
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर

पंजाबमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून रिलायन्स जिओ लक्ष्य, १५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोड

By बाळकृष्ण परब | Published: December 29, 2020 10:01 AM

Farmer Protest : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता. 

ठळक मुद्देआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पंजाबच्या विविध भागांमध्ये मोबाईल कंपन्यांच्या टॉवर्सना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहेपंजाबमध्ये आतापर्यंत ५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोडअनेक मोबाईल टॉवरचा वीजपुवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी केबलचे बंडल जाळण्यात आले आहेत

चंदिगड - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव पंजाबमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पंजाबच्या विविध भागांमध्ये मोबाईल कंपन्यांच्या टॉवर्सना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये आतापर्यंत ५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोड करण्यात आली आहे. अनेक मोबाईल टॉवरचा वीजपुवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी केबलचे बंडल जाळण्यात आले आहेत.कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता. नव्या कृषी कायद्यांचा सर्वाधिक फायदा उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यांना होणार असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या कंपन्यांच्या साधनसंपत्तीला लक्ष्य करण्यात येत आहे.

पंजाबमध्ये जिओचे ९ हजार मोबाइल टॉवर आहेत. त्यापैकी अनेक टॉवरचा वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. एका ठिकाणी काही लोकांनी मोबाइल टॉवरसाठी लावण्यात आलेला जनरेटर पळवला. सरकारी सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत ४३३ मोबाइल टॉवरची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्याने परिस्थिती चिघळली आहे.

दरम्यान, मोबाईल टॉवर लक्ष्य करण्यात येत असल्याच्या प्रकारांमुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पंजाबमध्ये अराजकता आणि कुठल्याही खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सहन केले जाणार नाही, अशा इशारा दिला आहे. राज्यात शांततापूर्वक आंदोलनांना स्थगिती दिली जाणार नाही. मात्र कुठल्याही संपत्तीचे नुकसान सहन केले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मोबाईल टॉवरच्या नुकसानीमुळे ऑनलाइन वर्ग आणि वर्क फ्रॉम होम, बँकिंग सेवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPunjabपंजाबRelianceरिलायन्सJioजिओ