Agastya Chauhan Accident: बहिणीनं आणलं होतं गिफ्ट, उघडूही शकला नाही YouTuber; अगस्त्यच्या अखेरच्या व्हिडीओची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 18:14 IST2023-05-04T18:14:02+5:302023-05-04T18:14:32+5:30
सोशल मीडियावर लाखो लोकांनी त्याला फॉलो केलं होतं. त्याला सुपर बाईकचीही खूप आवड होती.

Agastya Chauhan Accident: बहिणीनं आणलं होतं गिफ्ट, उघडूही शकला नाही YouTuber; अगस्त्यच्या अखेरच्या व्हिडीओची कहाणी
सोशल मीडियावर लाखो लोकांनी त्याला फॉलो केलं होतं. त्याला सुपर बाईकचीही खूप आवड होती. २० लाखांची जंबो बाईक घेऊन तो बाहेर पडायचा तेव्हा त्याच्या बाईकचा स्पीड निराळाच असायचा. तरुणांना त्याच्या व्हिडीओचं अतिशय क्रेझ होतं, पण डेहराडूनच्या २२ वर्षीय युट्यूबर अगस्त्य चौहानचा बुधवारी यमुना एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. एक दिवसापूर्वीच त्यानं त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडीओ पोस्ट केला होता. तोच त्याचा अखेरचाही व्हिडीओ ठरला.
त्यात त्यानं आपण डेहराडूनहून दिल्लीला जात असून तिथे पोहोचल्यावर बहिणीनं दिलेलं गिफ्ट उघडणार असल्याचं त्यानं यात सांगितलं. परंतु बुधवारीच त्याचा अपघातात मृत्यू झाला. यानंतर त्याच्या अनेक फॉलोअर्सनं दुःख व्क्त केलं आहे. ‘मित्रांनो, तुम्हाला माहितीये की माझी बहीण नुकतीच लंडनहून आली आहे. तिनं माझ्यासाठी गिफ्ट आणले होतं पण 20 दिवस ते असंच पडून आहे. तेव्हापासून अनबॉक्स केलेले नाही. मी दिल्लीला जाऊन हेही अनबॉक्स करेन,” असं तो त्या व्हिडीओत म्हणताना दिसतोय.
YouTuber दिल्लीचा रहिवासी होता
अगस्त्य चौहान हा दिल्लीचा रहिवासी होता. तो 'PRO RIDER 1000' नावाने यूट्यूब चॅनल चालवायचा. यावर तो आपल्या बाईकसह दैनंदिन आयुष्यातील व्हिडीओ टाकायचा. त्याच्या चॅनेलवर १० लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. अगस्त्य बाईक चालवताना प्रोफेशनल व्हिडीओ बनवत असे. तो आपल्या व्हिडिओमध्ये लोकांना वेगाने गाडी न चालवण्याचा इशाराही द्यायचा.
बाईक ३०० च्या स्पीडने पळवली...
अगस्त्यने यमुना एक्सप्रेसवेवर ३०० च्या वेगाने रेसिंग बाइक चालवत होता, यावेळी त्याचं बाईकवरील नियंत्रण सुटलं. यावेळी त्याची बाईक डिव्हायडरला धडकल्यानं अगस्त्यचा मृत्यू झाला. अगस्त्य दिल्लीत होणाऱ्या लाँग राईड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात होता. विशेष म्हणजे, अगस्त्य बाईक चालवताना व्हिडीओही बनवत होता.