शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

‘जेएनयू’त पुन्हा डावे, ‘दिल्ली’त अभाविप

By admin | Updated: September 11, 2016 06:59 IST

दिल्लीतील डाव्या विद्यार्थी चळवळींचे केंद्र असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा एकदा डाव्यांनीच बाजी मारली आहे

नवी दिल्ली : दिल्लीतील डाव्या विद्यार्थी चळवळींचे केंद्र असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा एकदा डाव्यांनीच बाजी मारली आहे. तर दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बाजी मारली असून, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सरचिटणीसपदी त्याच संघटनेचे विद्यार्थी निवडून आले आहेत. सहचिटणीसपदी काँग्रेसप्रणीत नॅशनल स्टुडंटस् युनियन आॅफ इंडियाचा (एनएसयूआय) विद्यार्थी निवडून आला आहे. जेएनयूत सर्व चार जागा जिंकून डाव्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जेएनयू स्टुडंटस् युनियनचा मावळता अध्यक्ष कन्हैया कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्यामुळे हे विद्यापीठ चर्चेत आले होते. अभाविपने दिल्ली विद्यापीठात विजय मिळवला असला तरी आतापर्यंत तिथे त्याच संघटनेची सत्ता होती; मात्र चार वर्षांनंतर प्रथमच एनएसयूआयचा एक जण तरी पदाधिकारी झाला आहे. जेएनयूमध्ये अभाविपला भोपळाही फोडता आला नाही. दिल्ली विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शुक्रवारी निवडणुका झाल्या. दिल्ली विद्यापीठ स्टुडंट युनियनच्या निवडणुकीत ३५ टक्के विद्यार्थ्यांनी मतदान केले. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी ८ टक्के मतदान कमी झाले, तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात स्टुडंट युनियनच्या निवडणुकीत विक्रमी ५९ टक्के म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेत यावेळी ६ टक्के अधिक मतदान झाले.