शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

तीन राज्ये जाताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवले मित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 7:04 AM

म्हणाले, जुन्या दोस्तांशी आघाडीस तयार : वाजपेयींच्या मार्गावर पुढे वाटचाल करण्याची दिली ग्वाही

चेन्नई : तीन राज्यांमध्ये झालेला पराभव आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणाऱ्या पक्षांची वाढत चाललेली संख्यायाचा फटका बसू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मित्रपक्षांना सोबत घेण्याची भाषा सुरू केली आहे. मित्रपक्षांसोबत आघाडी करण्यास भाजपा तयार आहे. सर्वांना सोबत घेऊनच आम्ही वाटचाल करू. जुन्या मित्रांचाही सन्मानच करतो, असे मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

आसाम गण परिषद रालोआतून बाहेर पडता. त्याआधी उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष, तेलगू देसमही बाहेर पडले, तर शिवसेना सातत्याने भाजपा व मोदी यांच्यावर टीका करीत असून, युती गेली खड्यात अशी उद्धव ठाकरे यांची भाषा आहे. गेल्या, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, पीएमके, एमडीएमकेसह सहा पक्षांच्या आघाडीने तामिळनाडूत लोकसभेच्या ३९ जागा लढविल्या. त्यापैकी भाजप व पीएमकेने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. मात्र त्यानंतर हे पाचही पक्ष आघाडीतून बाहेर पडले.तामिळनाडूत बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधनाता मोदी म्हणाले की, १९९०च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी

आघाडी सरकार उत्तमरित्या चालवून दाखविले. त्यांनी प्रादेशिक पक्षांना नेहमीच महत्त्व दिले. या मार्गावरच भाजपाने पुढे वाटचाल केली आहे. आघाडीसाठी भाजपाचे दरवाजे सदैव खुले आहेत.अद्रमुक, द्रमुक किंवा अभिनेते रजनीकांत यांच्याशी युती करणार का या प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना नेहमीच वाईट वागणूक दिली. त्या-त्या राज्यांतील लोकांची मते, अस्मिता यांना कायम दुय्यम लेखले. राज्य करण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे, अशा भ्रमात काँग्रेस पक्ष होता. एनडीए ही मजबूत आघाडीमोदी म्हणाले की, रालोआ मजबूत आहे. त्यातील मित्रपक्षांचा परस्परांवर गाढ विश्वास आहे. भाजपाला स्वबळावर जरी बहुमत मिळाले तरी मित्रपक्षांनाही सरकारमध्ये घेऊ. जास्तीत जास्त लोक जोडणे हे राजकीय आघाडीपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक