एअर इंडिया टाटांकडे परतल्यानंतर एक वर्तुळ झाले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 06:11 AM2022-01-28T06:11:20+5:302022-01-28T06:11:48+5:30

सरकारी नियंत्रणातून झाली मुक्तता, १९५३ मध्ये झाले होते राष्ट्रीयीकरण

After the return of Air India to Tata, a circle was formed | एअर इंडिया टाटांकडे परतल्यानंतर एक वर्तुळ झाले पूर्ण

एअर इंडिया टाटांकडे परतल्यानंतर एक वर्तुळ झाले पूर्ण

Next

नवी दिल्ली : एअर इंडियाची टाटा उद्योग समूहाकडे सुमारे ६९ वर्षांनी घरवापसी झाली आहे. जे. आऱ. डी. टाटा यांनी १९३२ साली सुरू केलेल्या विमान कंपनीचे केंद्र सरकारने १९५३ साली राष्ट्रीयीकरण केले होते. जे. आऱ. डी. टाटा यांनी १९३२ साली स्थापन केलेल्या विमान कंपनीचे नाव टाटा एअर सर्व्हिसेस होते. या कंपनीला प्रथम टपाल वाहतुकीची परवानगी मिळाली होती. 

जेआरडी टाटा हे निष्णात वैमानिक होते. त्यांनी टपाल घेऊन १५ ऑक्टोबर १९३२ टाटा एअर सर्व्हिसच्या विमानाचे स्वत: पहिले उड्डाण कराची ते मुंबई या मार्गावर केले. १९३८मध्ये या कंपनीचे नाव टाटा एअरलाईन्स ठेवण्यात आले. त्यानंतर १९४६ मध्ये या कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले. १९५३ साली एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

स्थापना : १९३२
n    संस्थापक : जहांगीर रतनजी दादाभॉय (जेआरडी) 
n    टाटा सन्सचा विमान वाहतूक विभाग एअर इंडिया रूपात सूचीबद्ध : १९४६ 
n    पहिले उड्डाण युरोपसाठी
n    एअर इंडिया इंटरनॅशनल सेवा : १९४८ 
n    ही सेवा सार्वजनिक - खासगी भागीदारीपैकी एक होती, ज्यात ४९ टक्के सरकार, २५ टक्के टाटा आणि उर्वरित लोकांच्या ताब्यात होती.
n    एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण : १९५३ त्यानंतर पुढील चार दशके भारताच्या देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रावर एअर इंडियाने राज्य केले.

n    १९९४-९५ मध्ये खासगी कंपन्यांसाठी विमान वाहतूक क्षेत्र सुरू झाल्याने एअर इंडियाचा हिस्सा कमी होऊ लागला.
n    एप्रिल २०२१ : सरकारने एअर इंडियासाठी आर्थिक निविदा मागविण्यास सुरुवात केली. 
n    सप्टेंबर २०२१ : टाटा समूह, स्पाईस जेटचे प्रवर्तक अजय सिंग यांनी आर्थिक बोली लावली.
n    ८ ऑक्टोबर २०२१ : सरकारने जाहीर केले की, टाटा समूहाने एअर इंडियासाठी १८,००० कोटी रुपयांची बोली यशस्वीपणे लावली आहे.

Web Title: After the return of Air India to Tata, a circle was formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.