शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार म्हणजे काय? अत्याचाराच्या २ दिवस आधीच आसाममधील पीडितेने विचारला होता प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 18:13 IST

कोलकाता प्रकरणानंतर बलात्कार म्हणजे काय असा सवाल आसाममधील सामूहिक बलात्कार पीडितेने केला होता.

Assam Rape Case : कोलकाता आणि बदलापूरच्या अत्याचार प्रकरणांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. अशातच आसामध्येही मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आलीय. ट्यूशनवरुन घरी परतत असताना अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन सामूहिक अत्याचार करण्यात आला. बलात्कारानंतर आरोपींनी पीडित मुलीला शेताजवळ सोडून दिलं. आता त्याच पीडितेच्या एक गोष्टींने लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. अत्याचाराची घटना होण्याआधीच पीडितेने तिच्या कुटुंबियांनी देशभरात सुरु असलेल्या अत्याचारांच्या घटनांबाबत विचारलं होतं. दोनच दिवसांनी पीडितेवर असा प्रसंग ओढावला की त्यामुळे तिला मोठा धक्का बसला.

आसाममधील नागाव जिल्ह्यात २२ ऑगस्ट रोजी एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर  खळबळ माजली. या प्रकरणात आता रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीडित अल्पवयीन मुलीने घटनेच्या दोन दिवस आधी तिच्या मावशीला बलात्कार म्हणजे काय असे विचारले होते. पीडितेच्या एका महिला नातेवाईकाने सांगितले की, कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे पीडित मुलगी खूप व्यथित झाली आहे. या घटनेची बातमी वाचल्यानंतर तिने काकीला या घटनेबद्दल विचारलं होतं. या घटनेचा अल्पवयीन मुलीच्या मनावर खोलवर परिणाम झालाय असं वाटत होतं असं पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले.

"कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर देशातील महिला सुरक्षेवर झालेल्या चर्चेदरम्यान पीडितेने या विषयांवरील लेख वाचले होते. उत्सुकतेपोटी, “बलात्कार म्हणजे काय?” असेही विचारले होते. तिच्यासोबत इतकी भयंकर घटना घडेल असे मला वाटले नव्हते. मी तिला वाचवू शकले नाही," असे पीडितेच्या मावशीने म्हटलं.

पीडिता आजी-आजोबा, काका-काकूंसोबत राहत होती. लहानपणीच तिची आई वारली होती. तर वडील गुवाहाटी येथे काम करतात. पीडिता सहसा ट्यूशनवरून तिच्या मावशीसोबत किंवा रिक्षातून घरी परतत असे. घटनेच्या दिवशी ती सायकलने परतत होती. ट्यूशनमधून घरी परतत असताना तिच्या घरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. स्थानिकांना ती भाताच्या शेतात बेशुद्धावस्थेत आढळला होती. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पीडितेला शिक्षण घेऊन खूप पुढे जायची होती. पोलीस दलात अधिक्षक पदापर्यंत पोहोचण्याचे तिचे स्वप्न होते. या घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल केले असता महिला पोलीस अधिक्षक तिला भेटण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा पीडितेने त्यांच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न केला होता.

टॅग्स :AssamआसामCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस