शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"जो न्यायासाठी लढतो त्याच्यासोबत...", चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतल्यानंतर पैलवानांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 15:16 IST

Bhim Army Chief Chandrashekhar Azad : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर बुधवारी अज्ञातांनी गोळीबार केला.

Chandrashekhar Azad Attack : उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील देवबंद इथे बुधवारी अज्ञातांनी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात आझाद थोडक्यात बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळ्या झाडल्या असता त्यातील एक गोळी आझाद यांना स्पर्श करून गेली. चंद्रशेखर यांच्यावर सहारनपूर येथील इस्पितळात उपचार सुरू असून पैलवान बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी तिथे जाऊन त्यांची विचारपूस केली आहे. 

पुनिया आणि मलिक या दोन्ही पैलवानांनी इस्पितळात जाऊन आझाद यांच्या तब्येतीची विचारपूस केली. बजरंग पुनियाने चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत म्हटले, "जो सत्यासाठी, न्यायासाठी लढत आहे, त्यांच्यासोबत हे असेच होत आहे. प्रत्येक समाजातील लोक आज त्यांच्यासोबत उभे आहेत. चंद्रशेखर हे प्रत्येक आंदोलनात पुढाकार घेत असतात."  जीवघेण्या हल्ल्यात थोडक्यात बचावले दरम्यान, चंद्रशेखर आझाद यांच्यावर बुधवारी अज्ञातांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या देवबंद येथे पोहचताच भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्ल्यात आझाद जखमी झाले असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. चंद्रशेखर हे त्यांच्या खासगी वाहनाने देवबंद दौऱ्यावर जात होते. तेव्हा अचानक अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळी स्पर्श करून गेल्याने त्यांना दुखापत झाली असून गाडीवर देखील गोळ्यांचे निशाण दिसत आहेत.  चंद्रशेखर आझाद यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना उघड पाठिंबा दिला होता. त्यांनी स्वत: आंदोलनस्थळी जाऊन आंदोलक पैलवानांची भेट घेतली आणि सरकारने पैलवानांचे ऐकले नाही, तर भीम आर्मीही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आंदोलन करेल, असे म्हटले होते. दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारणही चांगलेच तापले आहे. चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याबाबत समाजवादी पार्टी, आरएलडी आणि काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेश सरकार तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर आझादBhim Armyभीम आर्मीUttar Pradeshउत्तर प्रदेश