शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
3
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
4
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
5
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
6
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
7
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
8
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
9
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
10
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
11
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
12
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
13
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
14
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
15
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
16
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
17
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
18
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
19
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
20
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रिपदावरून तणावानंतर सिद्धारामैय्या आणि शिवकुमार यांच्यात 'ब्रेकफास्ट पे चर्चा', मतभेद मिटणार?काँग्रेसमधील संकट टळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 11:37 IST

Karnataka Congress News: दिल्लीतील हायकमांड आणि पक्षनेतृत्वाने हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद आता निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच आज सकाळी मुख्यमंत्री सिद्दारामैय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांची बंगळुरूमध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेत ब्रेकफास्ट केला.

मुख्यमंत्री सिद्धारामैय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून तीव्र मदभेत निर्माण झाल्याने कर्नाटकमधीलकाँग्रेसचं सरकार सध्या अडचणीत आलेलं आहे. दोन्ही बाजूंनी होत असलेल्या शाब्दिक हल्ल्यांमुळे तवाण अधिकच वाढत होता. दरम्यान, दिल्लीतील हायकमांड आणि पक्षनेतृत्वाने हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद आता निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच आज सकाळी मुख्यमंत्री सिद्दारामैय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांची बंगळुरूमध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेत ब्रेकफास्ट केला.

सिद्धारामैय्या आणि शिवकुमार यांच्यातील वादावर प्रतिक्रिया देताना कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी सांगितले की, काँग्रेसने योग्यवेळी हस्तक्षेप करून परिस्थिती सावरली आहे. तर हायकमांडकडून नेतृत्व परिवर्तनाबाबत कुठलेही दिशानिर्देश मिळालेले नाहीत, असे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धारामैय्या यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्यातरी कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाचा कुठलाही निर्णय झालेला नाही, हे स्पष्ट होत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांनी जे पक्ष सांगेल ते मी करणार आहे, असे स्पष्टपणे सांगितले आहे. तर सिद्धारामैय्या यांची भेट घेतल्यानंतर आता डी. के. शिवकुमार हे दिल्लीला रवाना होणार आहेत. शिवकुमार हे आज दुपारी दिल्लीला जाण्याची शक्यता असून, संध्याकाळी ते मेकदातू योजनेबाबत होणाऱ्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी होणार  आहेत. तर मुख्यमंत्री सिद्धारामैय्या हे काँग्रेसच्या पार्टी हायकमांडकडून अधिकृतरीत्या बोलावणं आल्यानंतरच दिल्लीला जाणार आहेत.

दरम्यान, सिद्धारामैय्या आणि शिवकुमार यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना गुरुवारी संध्याकाळी एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली होती. तसेच काँग्रेस हायकमांडचे निकटवर्तीय असलेले ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांनी सिद्धारामैय्या आणि शिवकुमार यांना फोन करून सक्त ताकिद दिली होती. सोशल मीडियावर एकमेकांविरोधात टीकाटिप्पणी करणे ही काँग्रेसची संस्कृती नाही, दिल्लीत येण्यापूर्वी परस्परातील मतभेद मिटवा, असे वेणुगोपाल यांनी या नेत्यांना सांगितले होते. तसेच दोन्ही नेत्यांना लवकरच दिल्लीला बोलावलं जाईल आणि एकाच ठिकाणी बसून मतभेदांवर चर्चा केली जाईल, असेही वेणुगोपाल यांनी सांगितले होते. त्याबरोबरच पक्षातील ऐक्य हे सर्वात महत्त्वपूर्ण असून, अंतिम निर्णय हा पक्षाच्या हायकमांडकडून घेतला जाईल, त्यामुळे परस्परांमधील मतभेद टाळा आणि निर्णय पक्षावर सोडा असा सल्ला त्यांना देण्यात आला होता.  

English
हिंदी सारांश
Web Title : Karnataka Congress leaders meet after tension; differences to be resolved?

Web Summary : Karnataka CM Siddaramaiah and D.K. Shivakumar met for breakfast amid leadership tension. High command intervention aims to resolve differences. Further discussions in Delhi are expected to address the issues.
टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणsiddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटक