शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात चप्पल चोरीस गेल्याने नवरदेव संतापला, मित्रांच्या मदतीने खून केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 17:22 IST

लग्नात चप्पल चोरीस गेल्याने संतापलेल्या नवरदेवाने मित्रांच्या मदतीने एका संशयित व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून नवरदेव आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बदायूं ( उत्तर प्रदेश) - लग्नात चप्पल चोरीस गेल्याने संतापलेल्या नवरदेवाने मित्रांच्या मदतीने एका संशयित व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून नवरदेव आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नवरदेव आणि त्याचे मित्र विवाह सोहळ्यामधील रीतिरिवाज पूर्ण करण्यासाठी सासरी आले होते. त्यावेळी ही घटना घडली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बदायूं जिल्ह्यातील बिल्सी येथील हा प्रकार आहे. येथील सुरेंद्र नावाच्या तरुणाचा विवाह सूरजपूर गावात होणार होता. बुधवारी सुरेंद्र वऱ्हाड घेऊन गावात आला. तेथे विवाहासाठी त्याने पायातील चपला काढून ठेवल्या. विवाहातील विधी पूर्ण झाल्यानंतर सुरेंद्रचा चपला हरवल्याचे समोर आले. त्यामुळे नवरदेव सुरेंद्र आणि त्याच्या मित्रांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी तेथेच उभ्या असलेल्या रामसरणवर चपला चोरल्याचा आरोप केला. वादावादी वाढताच त्यांनी रामसरण याल मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथे उपस्थित असलेली मंडळी मध्यस्ती करून रामसरणला वाचवेपर्यंत नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी रामसरणला रक्तबंबाळ केले. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.  त्यानंतर मृत रामसरण याची पत्नी मीरा देवी हिने नवरदेवर सुरेंद्र आणि त्याच्या चार मित्रांवर हत्येचा आरोप करत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलियांनी या सर्वांवर हत्येचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, रामसरण याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेश