शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर, महिलांमध्ये जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न'; PM मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 21:17 IST

जेव्हा तीन तलाक विरोधात कायदा आणला गेला, तेव्हा ते मुस्लीम महिलांच्या अधिकारांसाठी का उभे राहिले नाही?'' असा सवालही पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.

या लोकांनी महिला आरक्षण विधेयक तीन दशकांपर्यंत रोखून ठेवले होते. आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर, विरोधक महिलांमध्ये जाती, धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते वडोदरा येथे "नारी शक्ती वंदनशी" संबंधित एका कार्यक्रमात बोलत होते.

महिला आरक्षणासंदर्भात काँग्रेस, सपा, जेडीयू आणि आरजेडीसह इतरही काही विरोधी पक्षांनी महिला आरक्षण विधेयकात ओबीसी आरक्षण जोडण्याची मागणी केली आहे. याच बरोबर विरोधकांनी महिला आरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा अशी मागणीही केली आहे.

तत्पूर्वी, आदिवासी बहूल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोदेली येथे जनसभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, माझ्या नावावर घर नाही, पण मी देशातील अनेक मुलींच्या नावावर घरे होण्यासाठी काम केले. आमच्या सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे, जे तीन दशकांपासून पडून होते. गरिबांना घर, पाणी, रस्ते, वीज आणि शिक्षण देण्याला आमचे प्राधान्य आहे. आज गरिबांसाठी देशभरात चार कोटींहून अधिक पक्की घरे बांधण्यात आली आहेत. एवढेच नाही, तर आदिवासी समाजासाठी त्यांच्या इच्छेनुसार घरे बांधण्यात आली आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

"तेव्हा ते मुस्लीम महिलांच्या अधिकारांसाठी का उभे राहिले नाही?" -मोदी म्हणाले, ''त्यांनी (विरोधी पक्षांनी) उज्ज्वला योजनेची खिल्ली उडवली. जेव्हा आम्ही मुस्लीम महिलांना तीन तलाकपासून मुक्ती देण्यासंदर्भात बोलत होतो, तेव्हा त्यांना राजकीय समिकरणाची चिंता होती. त्यांना मुस्लीम महिलांच्या इधिकाराची काळजी नव्हती. त्यांना केवळ आपल्या मतपेटीची चिंता होती. एवढेच नाही, तर जेव्हा तीन तलाक विरोधात कायदा आणला गेला, तेव्हा ते मुस्लीम महिलांच्या अधिकारांसाठी का उभे राहिले नाही?'' असा सवालही पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWomen Reservationमहिला आरक्षणWomenमहिलाEducationशिक्षणBJPभाजपा