शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या झाडाझडतीनंतर पावसाळी कामांना वेग

By admin | Updated: June 8, 2016 01:50 IST

पुणे : मान्सूनचे आगमन होण्यास दोन दिवसांचा कालावधी उरला असतानाही अद्याप पावसाळी कामे पूर्ण न झाल्याने महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी क्षेत्रिय कार्यालयातील अधिकार्‍यांची झाडाझडती घेतल्यानंतर अखेर पावसाळी कामे पूर्ण करण्यास वेग आला आहे. येत्या ३ दिवसात ही सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश कुणाल कुमार यांनी काढले आहेत. यापार्श्वभुमीवर शहराच्या अनेक भागांमध्ये नाले, पावसाळी गटारे यांच्या सफाईची कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे.

पुणे : मान्सूनचे आगमन होण्यास दोन दिवसांचा कालावधी उरला असतानाही अद्याप पावसाळी कामे पूर्ण न झाल्याने महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी क्षेत्रिय कार्यालयातील अधिकार्‍यांची झाडाझडती घेतल्यानंतर अखेर पावसाळी कामे पूर्ण करण्यास वेग आला आहे. येत्या ३ दिवसात ही सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश कुणाल कुमार यांनी काढले आहेत. यापार्श्वभुमीवर शहराच्या अनेक भागांमध्ये नाले, पावसाळी गटारे यांच्या सफाईची कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाने केलेल्या नालेसफाईच्या कामाची तपासणी करण्यासाठी कुणाल कुमार यांनी मुख्य खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती करून त्यांना त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दरवर्षी नाले, पावसाळी गटारे सफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन दिली जाते, मात्र ही डेडलाइन पाळली गेली नाही. त्यानंतर आता १० जून पर्यंत सर्व पावसाळी कामे पूर्ण करण्याची डेडलाइन आखून देण्यात आली आहे.
नगरअभियंता प्रशांत वाघमारे, सहायक आयुक्त श्रीनिवास बोनाला, व्ही.जी.कुलकर्णी, मदन आढारी, संदिप खांडवे, राजेंद्र राऊत, अनिरुध्द पावसकर, प्रविण गेडाम, हेंमत देवधर, विजयकुमार शिंदे, नरेंद्र साळुंखे, युवराज देशमुख, श्रीकृष्ण चौधरी आणि नंदकिशोर जगताप या अधिकार्‍यांवर क्षेत्रिय कार्यालयनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी सफाईच्या कामाांची तपासणी करायची आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचाही आढावा घेण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.
क्षेत्रिय कार्यालयांना पावसाळी कामे पूर्ण करण्यासाठी येणार्‍या अडचणींचा यावेळी आढावा घेण्यात आला. काही क्षेत्रिय कार्यालयांना यंत्रसामुग्री कमी पडत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यानुसार त्यांना तातडीने त्याची व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. आत्पकालीन व्यवस्थापनाबाबतही चर्चा करण्यात आली.
पीएमसी केअरच्या माध्यमातून क्षेत्रिय कार्यालय निहाय व विविध खातेनिहाय प्राप्त झालेल्या आकडेवारीचा आढावा आयुक्तांनी घेतला. दैनंदिन कामकाजाच्या अनुषंगाने पीएमसी केअर तसेच सोशल मिडीया व मनपा संकेतस्थळ, स्वागत कक्ष, लोकशाही दिन या विविध माध्यमातून येणार्‍या तक्रारींचे जलद निवारण करण्याचेही आदेश तयांनी दिले आहेत. स्वच्छ भारत अभियानांर्तगत घनकचरा व्यवस्थापनाकरीता कामकाज स्तर वाढविणे, घरोघरी कचरा उचण्याच्या प्रमाणात वाढ करणे, जादा व सातत्याने कचरा होणार्‍या जागांचे नियोजन करून कचर्‍यामध्ये घट करणे आदी उपाय योजना करण्यास यावेळी सांगण्यात आले.