Sonia Gandhi Corona Positive : प्रियांका गांधींनंतर, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 13:01 IST2022-08-13T12:58:41+5:302022-08-13T13:01:57+5:30

आज सोनिया गांधी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे...

After Priyanka Gandhi, Congress President Sonia Gandhi is infected with Corona virus | Sonia Gandhi Corona Positive : प्रियांका गांधींनंतर, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण

Sonia Gandhi Corona Positive : प्रियांका गांधींनंतर, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्या नुकत्याच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी माहिती दिली आहे. आज सोनिया गांधी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच सरकारच्या  नियमांचे पालन करत, आता त्या आयसोलेशनमध्ये आहेत. असे त्यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधी यांना गेल्या काही दिवसांपूर्वीही कोरोना झाला होता. गेल्या 10 ऑगस्टला प्रियांका यांनी ट्विट करत, आपल्याला पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. आपण घरीच आयसोलेट राहणार असून कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी यांना 3 महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

तसेच, माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मी काल रात्री पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. सुरक्षिततेच्या कारणास्तव या काळात पूर्णपणे होम क्वारंटाईन राहील. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनीही स्वतःची कोरोना टेस्ट करून  घ्यावी, असे मी आवाहन करतो, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.


 

Web Title: After Priyanka Gandhi, Congress President Sonia Gandhi is infected with Corona virus