प्रज्वल रेवण्णानंतर त्याचा भाऊ सूरज...! तरुणाला फार्महाऊसवर बोलवून कपडे काढले, समलैंगिक संबंधांचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 21:35 IST2024-06-22T21:35:19+5:302024-06-22T21:35:58+5:30
एच डी देवेगौडा यांचा आमदार मुलगा एचडी रेवण्णा आणि गेल्या लोकसभेचा खासदार नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडलने कर्नाटकात खळबळ उडवून दिलेली असताना आता दुसरा नातू देखील अडचणीत आला आहे.

प्रज्वल रेवण्णानंतर त्याचा भाऊ सूरज...! तरुणाला फार्महाऊसवर बोलवून कपडे काढले, समलैंगिक संबंधांचे गंभीर आरोप
माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा आमदार मुलगा एचडी रेवण्णा आणि गेल्या लोकसभेचा खासदार नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडलने कर्नाटकात खळबळ उडवून दिलेली असताना आता दुसरा नातू देखील अडचणीत आला आहे. एका तरुणाने देवेगौडांचा नातू सूरजवर गंभीर आरोप केला आहे. सूरज रेवण्णावर हसन जिल्ह्यातील होलनसीपुरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने सूरजवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पोलिसांनी सूरजविरुद्ध भादंवि कलम ३७७, ३४२, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सख्खा भाऊ आणि पिता लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अडकलेला असताना देखील सूरजने काही दिवसांपूर्वी म्हणजेच १६ जूनला एका तरुणाला त्याच्या फार्म हाऊसवर बोलावले होते. बोलणे झाल्यानंतर त्याने त्या तरुणाच्या खांद्यावर हात ठेवला आणि कानाला हात लावत अश्लिल स्पर्श करू लागला. तसेच या फार्महाऊसमध्ये मी आणि तूच आहोत. मी तुझी शेवटपर्यंत साथ देईन असे सांगितले.
यामुळे धक्का बसलेल्या तरुणाने त्याला ढकलले, तेव्हा त्याने मी कोण आहे हे माहिती आहे ना, असा सवाल करत साथ नाही दिलीस तर तुला मारून टाकले जाईल असे सांगत दबाव टाकून तरुणाचा किस घेत ओठांना चावू लागला. तसेच त्या तरुणाला आतल्या खोलीत नेत कपडे काढायला लावून शरीर संबंध ठेवले. या प्रकाराची माहिती तरुणाने पोलिसांना दिली आहे. यानुसार पोलिसांनी समलैंगिक शोषण केल्या प्रकरणी सूरजविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सूरज रेवण्णाने आधीच एक गुन्हा दाखल केला...
यापूर्वी सूरज रेवण्णाने ब्लॅकमेलच्या आरोपाखाली दोन लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सूरज रेवण्णा आणि शिवकुमार यांनी चेतन आणि त्याच्या एका नातेवाईकाविरोधात तक्रार दाखल केली होती. हे लोक सूरजला ब्लॅकमेल करत होते, असे त्यात म्हटले आहे. त्यांनी ५ कोटी रुपयांची मागणी केली होती.