अल्पवयीन दीराने केली वहिनीची हत्या; पुतण्याचाही गळा दाबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 09:22 IST2019-06-02T09:21:34+5:302019-06-02T09:22:06+5:30

महिला तिच्या चार वर्षांच्या लहान मुलासोबत खोलीमध्ये झोपलेली होती.

after opposing physical relations the minor killed his sister-in-law and nephew | अल्पवयीन दीराने केली वहिनीची हत्या; पुतण्याचाही गळा दाबला

अल्पवयीन दीराने केली वहिनीची हत्या; पुतण्याचाही गळा दाबला

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील पटेलनगर भागात नात्याला काऴीमा फासणारी घटना घडली आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला पकडले असून तो मृत महिलेचा दीर आहे. पोलिसांना त्याच्या पायावर दातांनी चावल्याचे आणि गळा, चेहऱ्यावर नखांचे व्रण आढळले आहेत. चौकशीवेळी त्याने गुन्हा कबूल केला आहे. 


महिला तिच्या चार वर्षांच्या लहान मुलासोबत खोलीमध्ये झोपलेली होती. यावेळी तिचा अल्पवयीन दीर खोलीमध्ये येऊन तिच्यासोबत अवैध शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागला. यामुळे या महिलेने दिराला विरोध केला व वयाने मोठी असल्याने तिने त्याला मारहाणही केली. मात्र, या दिराने तिच्या तोंडावर बेल्टचे ठोसे लगावल्याने ती बेशुद्ध पडली. इतक्यात हा गोंधळ सुरु असताना महिलेचा चार वर्षीय मुलगा जागा झाला. 


मुलगा भावाला सांगेल या भीतीने या दिराने मुलाचा गळा दाबला आणि त्याला ठार केले. तसेच त्याची आत्महत्या असे दाखविण्यासाठी मुलाला पंख्याला लटकवत होता. तेवढ्यात महिलेला शुद्ध आल्याने तिने दिराच्या पायाला चावा घेतला. यामुळे दिराने घरातून चाकू आणत तिचा गळा चिरल्याचे जिल्हा पोलिस उपायुक्त मंदीर सिंह रंधावा यांनी सांगितले. ही घटना 30 मे रोजी घडली. 

घरमालकाचा मुलगा जेव्हा पाण्याची टाकी पाहण्यासाठी गेला तेव्हा त्याला महिलेची चप्पल बाहेर आणि दरवाजाला लॉक लागले असल्याचे दिसले. यामुळे त्याला संशय आला. ही महिला तिच्या पती आणि मुलासह दोन दिरांसोबत राहत होती. याचवेळी तिचे दोन्ही दीर घरी पोहोचले आणि दरवाजा उघडला असता महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आणि मुलाचा मृतदेह टांगलेला दिसला. पोलिसांना महिलेजवळ एक मोबाईल मिळाला ज्यामध्ये तिचा आणि आरोपीचा घटनेआधी सेल्फी काढलेला दिसला. तसेच आरोपीचे रक्ताने माखलेले एक लॉकेटही मिळाले. तसेच शेजाऱ्यांनी आरोपी दीर दुपारी घरातच असल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी चौकशी केल्यावर आरोपीने गुन्हा कबुल केला.
 

Web Title: after opposing physical relations the minor killed his sister-in-law and nephew