शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

गुलाम नबी यांच्यानंतर कर्ण सिंगही होणार ‘आझाद’? म्हणाले, “माझा कोणताही संबंध नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 15:19 IST

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाची साथ सोडली होती. त्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला आणखी एक झटका लागण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाची साथ सोडली होती. त्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला आणखी एक झटका लागण्याची शक्यता आहे. महाराजा हरी सिंग यांचे सुपुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री कर्ण सिंग यांनी आता काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत. मी १९६७ मध्ये काँग्रेससोबत आलो होतो. परंतु सध्या माझं नातं जवळपास नसल्यासारखंच आहे, असं ते म्हणाले.

“मी १९६७ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गेल्या ८-१० वर्षांपासून मी संसदेचा सदस्यही नाही. वर्किंग कमिटीमधूनही मला बाहेर काढण्यात आलंय. होय मी काँग्रेसमध्ये आहे. परंतु माझा कोणताही संपर्क नाही. कोणत्याही गोष्टीसाठी माझ्याशी संपर्क केला जात नाही. पक्षाशी माझं नातं जवळपास नसल्यासारखंच आहे,” असं कर्ण सिंग म्हणाले.

कर्ण सिंग हे १९६७ ते १९७३ पर्यंत केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय दिसत नाहीत. गुलाम नबी आझाद यांच्याप्रमाणेच कर्ण सिंग यांचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं नातं आहे. नुकतंच त्यांनी एक पुस्तकही लिहिलं होतं. त्याचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आलं होतं. त्यांनी आपल्या पुढील प्रवासाबद्दल आता वक्तव्य केलं नसलं, तरी ते काँग्रेसपासून नाराज असल्याचे संकेत मिळत आहेत.गुलाम नबी आझाद यांनीही सोडली साथगुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर आपला पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. ते सातत्यानं रॅली करत असून ते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार निशाणा साधत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा येऊ शकत नाही, असंही ते यापूर्वी म्हणाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसGhulam Nabi Azadगुलाम नबी आझाद