१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 19:39 IST2025-10-28T19:38:22+5:302025-10-28T19:39:58+5:30
राजस्थानमध्ये एका हॉटेलमध्ये पर्यटकांनी जेवण केले. दहा हजार रुपये बिल केले आणि पळून गेले. पण, हॉटेल मालकाने त्यांना रस्त्यात गाठले.

१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
राजस्थानमधील एका हॉटेलमध्ये काही पर्यटक जेवले, जेवनाचे बिल १० हजार ९०० रुपये झाले. गर्दीचा फायदा घेत सगळेजण पळून गेले. पण, रस्त्यावर ट्रॉफिक मोठ्या प्रमाणात होते. हॉटेल मालकाने या ट्रॉफिकमध्ये या लोकांना शोधून काढले आणि पैसे वसूल केले. ही घटना राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील रिको पोलिस स्टेशन परिसरातील आहे.
गुजरातमधील पाच पर्यटकांचा एक ग्रुप, यामध्ये एका महिलेचा समावेश होता, राजस्थानातील सिरोही जवळील सियावा परिसरातील हॅपी डे हॉटेलमध्ये थांबला होता. त्यांनी विविध प्रकारचे स्वादिष्ट जेवण ऑर्डर केले आणि भरपेट जेवले. बिल १०,९०० रुपये इतके झाले. ज्यावेळी पैसे देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी तेथून पळून जाण्याचा निर्णय घेतला.
घटनास्थळापासून पळून जाण्यासाठी, त्या ग्रुपने एक शक्कल लढवली. त्यांनी शौचालयात ब्रेक घेतला आणि एक एक करून, पाचही जण रेस्टॉरंटमधून बाहेर पडले. ते सर्वजण एका कारमध्ये बसले आणि घटनास्थळावरून पळून गेले. काही वेळात हॉटेल मालक आणि वेटरला पर्यटकांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यांना गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवरील अंबाजीकडे जाणारी कार दिसली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि पर्यटकांच्या एका ग्रुपने त्यांना फसवले असल्याचा दावा केला. हॉटेल मालकाने काही कर्मचाऱ्यांसह पर्यटकांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी एक वाहन घेतले आणि त्यांचा पाठलाग सुरू केला.
वाहतूक कोंडीत अडकले
हे पर्यटक पळून गेले असते, पण पर्यटकांचे वाहन वाहतूक कोंडीत अडकले. दरम्यान, हॉटेल कर्मचारी त्यांच्या जवळ आले. त्यांनी पर्यटकांचा गुजरात सीमेपर्यंत पाठलाग केला. अंबाजीजवळ वाहतूक कोंडी दरम्यान त्यांना पकडण्यात आले. हॉटेल कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या अटकेचे चित्रीकरण केले आणि घटनेचे रेकॉर्डिंग केले.
शेवटी बिल भरले
हॉटेल कर्मचाऱ्यांनी रेकॉर्ड केलेला एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाच पर्यटकांना अटक केली. त्यानंतर पर्यटकांनी एका मित्राला फोन करून बिल भरण्यासाठी ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. व्हायरल व्हिडिओमधील गाडीवर गुजराती नंबर प्लेट असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर या घटनेवर लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.