शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
2
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
3
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
4
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
5
Pawan Singh : "सलमान खानसोबत...", भोजपुरी स्टार पवन सिंहला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी
6
722847400000 रुपयांची बंपर कमाई...! टीसीएस, इन्फोसिसनं रिलायन्सला मागं टाकलं, गेल्या आठवड्यात ही कंपनी राहिली आघाडीवर
7
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी मिळायला सुरुवात"; निधीवरून शिंदे-चव्हाण यांच्यात जुंपली
8
सरकारच्या चहापानावर बहिष्कार; हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारवर घणाघाती आरोप
9
हृदयद्रावक! फुगा फुगवताना अचानक फुटला, श्वास नलिकेत अडकला अन्...; १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
10
Smriti Mandhana: "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
11
EMI चा भार हलका होणार! RBI च्या निर्णयापाठोपाठ 'या' ४ बँकांकडून कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात
12
मोठी दुर्घटना! लग्न समारंभात आनंदाने नाचत होते लोक, अचानक कोसळलं घर; २५ महिला जखमी
13
"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
14
हवाईत जगातील सर्वात घातक ज्वालामुखीचा उद्रेक, 400 मीटर उंच लावा उसळला; पाहा VIDEO
15
Palash Muchchal : "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट
16
66 पैशांच्या स्टॉकचा धमाका, एका महिन्यात पैसा डबल...! खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, सातत्यानं लागतंय अप्पर सर्क्रिट
17
Video: मालिका विजयानंतर विराट कोहलीने सिंहाचलम मंदिरात घेतला भगवान विष्णूचा आशीर्वाद...
18
कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन...
19
फक्त १२% नव्हे! EPFO मध्ये 'या' नियमानुसार जमा करता येतात जास्तीचे पैसे; निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड
20
गोवा आग प्रकरणात मोठी कारवाई; क्लबच्या मालकाला अटक, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : पैशांसाठी काय पण! आधी कोरोना मृताचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार अन् आता मदतीसाठी पसरले हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 08:46 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह स्वीकारण्यास कोणी आलं नाही आणि आता मृतांच्या नातेवाईकांना जी मदत केली जातेय ती घेण्यासाठी एकाच व्यक्तीच्या तीन मुलांनी क्लेम केल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह स्वीकारण्यास कोणी आलं नाही आणि आता कोरोना मृतांच्या नातेवाईकांना जी मदत केली जातेय ती घेण्यासाठी एकाच व्यक्तीच्या तीन-तीन नातेवाईकांनी त्यासाठी क्लेम केल्याची घटना समोर आली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर रुग्णांकडे पाठ फिरवणारे नातेवाईक आता मात्र मदत मिळावी म्हणून कायदेशीर बाबी करण्याची खटपट करताना पाहायला मिळत आहेत. यामुळे प्रशासनाच्या कामकाजात अनेक समस्या निर्माण होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पारू येथील एका कुटुंबातील वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी कुटुंबीयांनी त्यांना एसकेएमसीएच रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यानंतर कोरोनाचा संसर्ग आपल्याला देखील होईल या भीतीने कोणीही साधं त्यांना रुग्णालयात पाहायला देखील आलं नाही किंवा त्यांच्या तब्येतीची विचारपूरसही केली नाही.

वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतरही त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईक पुढे आले नाही. पण आता कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मिळणारी मदत मागण्यासाठी मात्र कुटुंबीयामध्येच स्पर्धा निर्माण झाली आहे. वृद्धाच्या पत्नीचं देखील निधन झालं आहे. त्याला तीन मुलं आणि मुली आहेत. त्या तिघांनीही आता मृत्यूनंतर मिळणाऱ्या मदतीसाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. पतीचा मृत्यू झाला तर पत्नीला आणि पत्नीचा मृत्यू झाला तर पतीला अशा स्वरुपाची मदत मिळते. मात्र हे दोघेही नसल्यास पुढच्या पीढीला म्हणजेच त्यांच्या मुलांना ही रक्कम मिळते. त्यामुळे मृत्यूनंतर आता मुलांनी मदतीसाठी हात पसरले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये वाढतोय ब्रेन हॅमरेजसारख्या आजारांचा धोका; रिपोर्टमधून मोठा खुलासा

कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये ब्रेन हॅमरेजसारख्या भयंकर आजारांचा धोका वाढत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्यविषयीच्या आणखी समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतील एका रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमधून याबाबत दावा केला आहे. कोरोनातून ठीक झाल्यानंतर रुग्णांमध्ये न्यूरोल़ॉजिकल समस्यांचा अधिक घातक स्वरूपात वाढत असल्याचं दिसून येत आहे. रुग्णालयातील सीनियर न्यूरोसर्जन डॉ. आशा बक्शी यांनी 37 टक्के रुग्णांमध्ये डोकेदुखी सारखी लक्षणं दिसून येत आहेत. तर 26 टक्के रुग्णांमध्ये चव समजत नसल्याचं समोर आलं आहे. आरोग्यविषयीच्या या समस्यांमुळे रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यचे प्रमाण वाढत आहे. कोरोना व्हायरस हा फक्त फुफ्फुसाचा आजार नाही तर न्यूरोलॉजिकल समस्या देखील असल्याचं डॉक्टर बक्शी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारIndiaभारतMONEYपैसाhospitalहॉस्पिटल