कोरोनानंतर आता भीती निपाहची, जाणून घ्या निपाह विषाणू काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 06:19 AM2021-09-07T06:19:19+5:302021-09-07T06:20:15+5:30

निपाह विषाणूची बाधा झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग होतो.

After Corona, now fear Nipah, find out what is Nipah virus? | कोरोनानंतर आता भीती निपाहची, जाणून घ्या निपाह विषाणू काय आहे?

कोरोनानंतर आता भीती निपाहची, जाणून घ्या निपाह विषाणू काय आहे?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क : कोरोनाची दुसरी लाट संपल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला जात असताना केरळात तिसऱ्या लाटेच्या निर्मितीची भीती व्यक्त झाली. केरळमध्ये दररोज नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत असताना आता तिकडे निपाह या विषाणूजन्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. बारा वर्षांचा मुलगा या आजाराचा बळी ठरलेला आहे. जाणून घेऊ निपाहविषयी...

निपाह विषाणू काय आहे?
निपाह हा प्राण्यांपासून माणसांमध्ये संक्रमित 
होणारा विषाणू आहे. 
वटवाघळात या विषाणूचे 
अंश निर्मित होतात. 
डुक्कर, कुत्रे आणि घोडे या प्राण्यांनाही निपाहची बाधा होण्याची शक्यता असते. 

निपाहची लक्षणे काय?
मेंदूज्वर
सतत खोकला येऊन 
ताप येणे आणि श्वसनात त्रास जाणवणे
श्वसननलिकेला सौम्य वा तीव्र स्वरूपाचा संसर्ग होणे
ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, घशाला सूज येणे, चक्कर येणे 
काही घटनांमध्ये लोकांना न्युमोनिया होण्याचाही धोका असतो. 

विषाणूने भरलेल्या वटवाघळाचा दंश झालेले फळ खाल्ल्यास किंवा वटवाघळांचा निवास असलेल्या झाडावरून पडलेले दूषित फळ खाण्यात आल्यास बाधा होण्याचा धोका असतो. 

निपाहची बाधा टाळण्यासाठी सातत्याने साबणाने हात धुणे गरजेेचे. बाजारातून आणलेली फळे धुवून खावीत.

निपाह विषाणूची बाधा झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग होतो.
ज्यांचा नित्य प्राण्यांशी संबंध येतो त्यांना हा आजार होण्याचा धोका सर्वाधिक असतो. 

निपाहसाठी औषध वा लस आहे का?
nसध्या तरी निपाहवर लस नाही. 
nरिबाविरिन हे औषध या विषाणूवर प्रभावी ठरत असल्याचे प्रयोगशाळेत निष्पन्न झाले आहे. मात्र, मानवी चाचण्यांमध्ये अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

निपाहचे निदान कसे केले जाते?
nआरटी-पीसीआरच्या माध्यमातून निपाहचे निदान होऊ शकते. 
nपीसीआर व व्हायरस 
आयसोलेशन या चाचण्याही केल्या जातात.

आतापर्यंत कुठे फैलाव झाला?
nमलेशिया, सिंगापूर, बांगलादेश 
आणि भारत या देशांमध्ये आतापर्यंत निपाहचा फैलाव झाला आहे. 
n२०१८ मध्ये निपाहने केरळमध्ये 
कहर केला होता.

 

 

Web Title: After Corona, now fear Nipah, find out what is Nipah virus?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.