शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

चंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 8:23 PM

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा काँग्रेसवर निशाणा

पाटणा: चंद्रयान-२नं अवकाशात झेप घेतल्यावर आता राजकारण सुरू झालं आहे. चंद्रयान-२च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर काँग्रेसनं ट्विट करत इस्रोची स्थापना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी केली होती, असं म्हणत मोदी सरकारला टोला लगावला. काँग्रेसच्या या खोचक टीकेला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं. चंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला, याची आठवण देशाला करुन देण्याची हीच योग्य वेळ आहे, असा चिमटा सिंह यांनी ट्विटमधून काढला. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.  

चंद्रयान-२ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर काँग्रेसनं पंडित जवाहरलाल नेहरुंचा शास्त्रज्ञांसोबतचा एक फोटो ट्विट केला. 'नेहरुंच्या दूरदृष्टीचं स्मरण करण्यासाठी आजचा दिवस अगदी सुयोग्य आहे. नेहरुंनी १९६२ मध्ये INCOSPARच्या स्थापनेच्या माध्यमातून अवकाश संशोधनाची सुरुवात केली. त्यानंतर हीच संस्था इस्रो म्हणून नावारुपास आली,' असं ट्विट करत काँग्रेसनं मोदी सरकारला टोला लगावला. काँग्रेसनं ट्विटमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचादेखील उल्लेख केला. 'चंद्रयान-२ मोहिमेला २००८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीच मान्यता दिली होती. या गोष्टीचं स्मरण करण्यासाठीदेखील आजचा दिवस अतिशय योग्य आहे,' असं काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलं. काँग्रेसनं नेहरु आणि मनमोहन सिंग यांचा संदर्भ देत केलेल्या खोचक टीकेला भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी उत्तर दिलं. 'चंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला होता, हे देशाला सांगण्याची हीच वेळ आहे,' अशी कोपरखळी सिंह यांनी मारली. सिंह अनेकदा त्यांच्या विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात संयुक्त जनता दलानं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यावर नवरात्र काळात फलाहाराचं आयोजन केलं असतं, तर किती चांगलं चित्र दिसलं असतं, अशा खोचक शब्दांत सिंह यांनी संयुक्त जनता दलावर निशाणा साधला होता. आपण कर्मधर्मात मागे का पडतो आणि दिखाऊपणात पुढे का असतो, असा सवालदेखील त्यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला होता. 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूManmohan Singhमनमोहन सिंगcongressकाँग्रेस