युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:24 IST2025-05-11T14:13:07+5:302025-05-11T14:24:50+5:30
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने उल्लंघन केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीत तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांसह राजनाथ सिंह देखील उपस्थित होते.

युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशात तणाव अखेर काल संपला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती करत युद्धबविराम केली. ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली. पण, काल रात्री पाकिस्तानकडून उल्लंघन करण्यात आले. त्यांच्याकडून रात्रीही गोळीबार झाल्याचे समोर आले. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि संरक्षण प्रमुख अनिल चौहान उपस्थित होते.
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
या बैठकीचा मुख्य उद्देश युद्धविरामनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेणे होता. बैठकीत पाकिस्तानने पाठवलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या घटनांवरही चर्चा झाली. गेल्या २४ तासांत पंतप्रधानांसोबतची ही तिसरी उच्चस्तरीय बैठक होती.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले की, भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम भूमिका घेतली आहे आणि ती पुढेही घेत राहील.
युद्धबंदीची घोषणा आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती, त्यांनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तान युद्धविरामवर सहमत झाले आहेत. काल भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाली, त्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने उल्लंघन केले आणि नियंत्रण रेषेपासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत गोळीबार सुरू केला.
पाकिस्तानने केले युद्धबंदीचे उल्लंघन
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. याला भारताने लगेचच प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय हद्दीत ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाठवणे थांबवले. जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर, गुजरातमधील काही भाग आणि राजस्थानमधील बारमेरसह अनेक ठिकाणी पाकिस्तानी ड्रोन दिसले आणि त्यांना रोखण्यात आले. अनेक सीमावर्ती भागात पुन्हा ब्लॅकआउट लागू करावा लागला.