हृदयद्रावक! सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं! लग्नाच्या 23 दिवसांनी 'त्याला' मृत्यूने गाठलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 17:20 IST2021-12-09T17:04:30+5:302021-12-09T17:20:11+5:30
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं असून एका भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे.

हृदयद्रावक! सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं! लग्नाच्या 23 दिवसांनी 'त्याला' मृत्यूने गाठलं
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका जोडप्याचं सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं आहे. लग्नाच्या 23 दिवसांनी 'त्याला' मृत्यूने गाठल्याची घटना घडली आहे. हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं असून एका भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. हरियाणाच्या भिवानीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक तरुण दूध विकून आपल्या घरी परतत असताना रस्त्यामध्ये त्याचा भीषण अपघात झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टम करण्यात येत आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 23 दिवसांआधीच तरुणाचं लग्न झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन असं या तरुणाचं नाव आहे. दूध विकून तो आपल्या बाईकने घरी परत येत होता. तेव्हा भिवानी-जींद मुख्य मार्गावर एका अज्ञात वाहनाने नवीनला चिरडलं. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अपघातामुळे दोन्ही बहिणींनी एकुलता एक भाऊ गमावला
नवीन याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीनला दोन बहिणी आहेत. 14 नोव्हेंबर रोजी त्याचं मोनिका नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. त्यामुळे घरामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण होतं. पण नवीनच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. अपघातामुळे दोन्ही बहिणींनी आपला एकुलता एक भाऊ गमावला आहे. या प्रकरणाशी संबंधीत अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.