शहरं
Join us  
Trending Stories
1
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
2
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
3
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
4
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
5
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
6
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
7
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
8
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
9
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
10
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
11
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
12
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
13
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
14
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
15
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
16
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
17
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
18
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
19
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
20
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर

दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 05:43 IST

विकासासाठी भारत करणार मदत, टेक्निकल मिशनला दूतावासाचा दर्जा; पाकिस्तानला मोठा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोणत्याही देशाविरोधात दहशतवादी कारवायांसाठी आमची भूमी कोणालाही वापरू देणार नाही. भारताच्या विरोधात काम करणाऱ्या कोणत्याही दहशतवादी गटाला व इसिसला अफगाणिस्तान थारा देणार नाही, असे आश्वासन शुक्रवारी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुताकी यांनी दिले. मुताकी हे सध्या सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, शुक्रवारी अफगाणिस्तानचे परराष्ट्र खात्याचे शिष्टमंडळ व भारताच्या परराष्ट्र खात्याचे शिष्टमंडळ यांच्यात द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली.

भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चर्चेत सीमापार दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी उभय देशांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे जयशंकर म्हणाले. त्यावर मुताकी यांनी सहकार्याचे  आश्वासन दिले.

चार वर्षांपूर्वी काय झाले होते?या चर्चेत भारताच्या अफगाणिस्तानातील टेक्निकल मिशनला दूतावासाचा दर्जा देण्याची, भारत अफगाणिस्तानात पुन्हा विकासकामे करणार असल्याची घोषणा जयशंकर यांनी केली. चार वर्षांपूर्वी तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर भारताने काबूल येथील आपला दूतावास बंद केला होता. त्यानंतर २०२२ मध्ये भारताने काबूलमध्ये टेक्निकल मिशन तैनात केले होते. 

कोण आहे मेहसूद? नूर वली मेहसूदचा जन्म २६ जून १९७८ रोजी दक्षिणी वजिरिस्तानच्या गुडगाव भागात झाला. तो पाकिस्तानचा मोस्ट वाँटेड अतिरेक्यांपैकी एक आहे. तो मुल्ला फजलुल्लाह याच्या मृत्यूनंतर संघटनेचा म्होरक्या झाला. २०१३ मध्ये मेहसूद कराचीत कारवाया घडवून आणत होता. संपूर्ण पाकिस्तानमध्ये अतिरेकी हल्ले घडवून आणण्यासाठी लागणारे पैसे उभारताना अपहरण व खंडणी वसुलीचे नेटवर्क तो उभे करीत होता. कराचीमधील वाद तालिबानच्या न्यायालयांत सोडविण्याचे फर्मानही त्याने काढले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Afghanistan Assures India: No Land for Terrorism Against Any Nation.

Web Summary : Afghanistan vowed to India that its soil won't be used for terrorism. Discussions included cross-border terrorism, with India offering support for development projects and upgrading its technical mission to embassy status.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तान