अदानींच्या प्रकल्पाला कर्ज नाकारणार?

By Admin | Updated: March 15, 2015 01:30 IST2015-03-15T01:30:59+5:302015-03-15T01:30:59+5:30

अदानी समूहातर्फे आॅस्ट्रेलियात उभारण्यात येणार असलेल्या कोळसा प्रकल्पासाठी मागण्यात आलेले १०० कोटी डॉलर्सचे कर्ज स्टेट बँक आॅफ इंडिया नाकारण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Advani's project to reject loan? | अदानींच्या प्रकल्पाला कर्ज नाकारणार?

अदानींच्या प्रकल्पाला कर्ज नाकारणार?

नवी दिल्ली : अदानी समूहातर्फे आॅस्ट्रेलियात उभारण्यात येणार असलेल्या कोळसा प्रकल्पासाठी मागण्यात आलेले १०० कोटी डॉलर्सचे कर्ज स्टेट बँक आॅफ इंडिया नाकारण्याच्या तयारीत असल्याचे समजते. भारतातील या सर्वांत मोठ्या बँकेतर्फे अद्याप तसे अधिकृतरीत्या कळवण्यात आले नसले तरी त्याची तयारी सुरू असल्याचे समजते.
मागील नोव्हेंबरमध्ये या कर्जाचा प्रस्ताव पुढे आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळी त्याबाबतच्या करारावर सह्या करण्यात आल्या. त्यावरून भारतात विरोधी पक्षांनी मोठा गहजब केला होता.

Web Title: Advani's project to reject loan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.