शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

5 वर्षांत 153 खासदारांची संपत्ती दुप्पट; सुप्रिया सुळे 'सुस्साट', शत्रुघ्न सिन्हाही 'फॉर्मात'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 11:13 AM

5 वर्षांत 153 खासदारांची संपत्ती दुप्पट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली- 5 वर्षांत 153 खासदारांची संपत्ती दुप्पट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2014मध्ये संसदेत पोहोचलेल्या 153 खासदारांच्या संपत्तीत 142 टक्क्यांची वाढ झाली आहे. संसदेत पुन्हा निवडून आलेल्या या खासदारांची वर्षं 2009मध्ये 5.50 कोटी एवढी सरासरी संपत्ती होती.यात दुपटीने वाढ झाली असून, ती सरासरी 13.32 कोटीपर्यंत गेली आहे, असा अहवाल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेनं दिला आहे. या यादीत भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा, बीजेडीचे खासदार पिनाकी मिश्रा आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सर्वात वरच्या स्थानी आहेत. भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. वर्ष 2009मध्ये त्यांची संपत्ती 15 कोटी रुपये होती, जी आता 2014मध्ये वाढून 131 कोटी रुपये झाली आहे. तर बीजू जनता दला(बीजेडी)चे पिनाकी मिश्रा यांची संपत्तीही 107 कोटी रुपयांनी वाढून 137 कोटी रुपये झाली आहे. संपत्तीच्या वाढीमध्ये तिसऱ्या स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. 2009मध्ये सुप्रिया सुळे यांची संपत्ती 51 कोटी रुपये होती. ती 2014मध्ये वाढून 113 कोटी झाली आहे. संपत्तीत सर्वाधिक वाढ होणाऱ्या पहिल्या दहा खासदारांमध्ये अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल सहाव्या स्थानी, तर वरुण गांधी 10व्या स्थानी आहेत.पाच वर्षांमध्ये ( वर्षं 2009 ते 2014)153 खासदारांच्या संपत्तीत सरासरी 7 कोटी 81 लाखांची वाढ नोंदवली गेली आहे. वरुण गांधी यांची संपत्ती 2009मध्ये चार कोटी होती. ती आता 2014मध्ये वाढून 35 कोटी झाली आहे. भाजपाच्या 72 खासदारांच्या संपत्तीत 7.54 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर काँग्रेसच्या  28 खासदारांची संपत्ती 6.35 कोटींनी वाढली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या वर्ष 2009मध्ये असलेल्या 2 कोटींच्या संपत्तीत वाढ होऊन वर्षं 2014मध्ये ती 7 कोटी इतकी झाली आहे. 

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाSupriya Suleसुप्रिया सुळेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक