वाळूज ३ जोड
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:24+5:302015-02-18T00:13:24+5:30
संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रियास्वतंत्र नगर परिषद व्हावी येथील लोकसंख्या ६० हजारांच्या आसपास पोहोचल्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची ...

वाळूज ३ जोड
>संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रियास्वतंत्र नगर परिषद व्हावी येथील लोकसंख्या ६० हजारांच्या आसपास पोहोचल्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची गरज असल्याचे माजी सरपंच सईदानबी पठाण यांनी सांगितले.वर्गणी गोळा करून विकासकामेगरीब नागरिकांना लोकवर्गणी करून साफसफाई व रस्त्याचे काम करावे लागत असून, या भागात कुठल्याच सुविधा मिळत नसल्याचे सुलेमान पटेल यांनी सांगितले.पाणीप्रश्न गंभीरहिदायतनगरसह लगतच्या परिसरात नळाला पाणी येत नाही. काही भागात तर नळ कनेक्शनच नाहीत. उन्हाळ्यापूर्वीच गावचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे, असे रायभान चव्हाण यांचे म्हणणे आहे. पायाभूत सुविधा मिळत नाहीतकर भरूनही ग्रामपंचायत पायाभूत सुविधा देत नसल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, असे विश्वनाथ थोरात यांनी सांगितले. सांडपाण्यामुळे आरोग्याला धोकासांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजलाईनची व्यवस्था नाही. सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागतो, असे स्वाती पाटील यांचे म्हणणे आहे. पाणी मिळत नाहीग्रामपंचायतीने कॉलनीमध्ये फक्त पाईपलाईन टाकून ठेवली आहे; पण नळ कनेक्शन दिलेले नाही, असे ताराबाई चौथमल यांनी सांगितले. जोड आहे