वाळूज २ जोड
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
कोट्यवधींचा निधी मिळूनही विकास खुंटला
वाळूज २ जोड
कोट्यवधींचा निधी मिळूनही विकास खुंटलाग्रामपंचायतीला विकास कामासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असतो. खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडून मोठा निधी मिळूनही विकासकामे होत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. कराची वसुलीही होते. ग्रामपंचायतीची सापत्न वागणूकग्रामपंचायतीच्या वतीने केवळ जुने गाव व शिवाजीनगर या भागांतच बहुतांश विकासकामे करण्यात आलेली आहेत. भारतनगर, अजवानगर, हिदायतनगर, अण्णा भाऊ साठेनगर, मनीषानगरचा काही भाग या गरीब कामगार वसाहतींना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. विकासकामे करताना दुजाभाव केला जात असल्यामुळे या कामगार वसाहती विकासापासून कोसो दूर आहेत.लोकप्रतिनिधी म्हणतात...पेयजल योजनेला वीज जोडणी मिळेनावाळूज गावात सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी पाच कोटींची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर असून, या योजनेचे बहुतांश काम पूर्ण करण्यात आले आहे. या योजनेसाठी वीज जोडणी द्यावी, यासाठी महावितरणकडे वर्षभरापासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, वीज जोडणी मिळत नसल्यामुळे पाणीपुरवठा करता येत नसल्याचे सरपंच रंजना भोंड यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी केवळ १२ कर्मचारी असून, कर्मचार्यांच्या वेतनासाठी निधीची कमतरता असल्यामुळे सुविधा पुरविताना दमछाक होते. कचर्यासाठी दोन लोडिंग रिक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे फारसे स्रोत नसल्यामुळे विकासकामे करताना निधीची चणचण भासत असल्याचे सरपंच रंजना भोंड म्हणाल्या.(जोड आहे)