अभिनेता किच्चा सुदीपचा भाजपसाठी प्रचार, लगेच आली धमकी; FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 14:31 IST2023-04-05T14:28:42+5:302023-04-05T14:31:09+5:30

कन्नड अभिनेता किच्चा सुदीप आणि दर्शन तुगुदीपा हे दोन्ही कलाकार कर्नाटकातील बंगळुरू येथील एका खासगी हॉटेलमध्ये दुपारी 1:30 आणि 2:30 वाजता पार्टीत सामील होतील.

Actor Kiccha Sudeep's campaign for BJP, immediate threat; FIR lodged | अभिनेता किच्चा सुदीपचा भाजपसाठी प्रचार, लगेच आली धमकी; FIR दाखल

अभिनेता किच्चा सुदीपचा भाजपसाठी प्रचार, लगेच आली धमकी; FIR दाखल

कर्नाटकमध्ये निवडणुकांचा धुरळा उडाला असून अनेक एक्झिट पोलमधून भाजपची पिछेहट दिसून येत आहे. त्यामुळे, यंदा भाजपने कर्नाटकनिवडणूक अतिशय मनावर घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही सभा होणार आहेत. तत्पूर्वी भाजपकडून कन्नडचा लोकप्रिय अभिनेता किच्चा सुदीप हा प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे. मी भाजपसाठी केवळ प्रचार करणार असून मी निवडणुकीत उमेदवार नसणार असल्याचे सुदीप याने मीडियाशी बोलताना सांगितले. 

कन्नड अभिनेता किच्चा सुदीप आणि दर्शन तुगुदीपा हे दोन्ही कलाकार कर्नाटकातील बंगळुरू येथील एका खासगी हॉटेलमध्ये दुपारी 1:30 आणि 2:30 वाजता पार्टीत सामील होतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करणार असल्याचेही माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत किच्चा सुदीपचाही समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजप प्रवेशाची चर्चा आणि प्रचाराच्या मुद्द्यावरुन कच्चा सुदीपला धमकीचे पत्र आले आहे. अभिनेत्याचे मॅनेजर जॅक मंजू यांना ही धमकी आली असून किच्चा सुदीप यांचे प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू अशी धमकी पत्रातून देण्यात आली. याप्रकरणी, बंगळुरुच्या पुतनहल्ली पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. 

बंगळुरुचे डीसीपी पी. कृष्णकांत यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, याप्रकरणी तपास सुरू असल्याचेही त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. 

किच्चा सुदीप हा केवळ दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय अभिनेता आहे. 'फुंक' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तसेच, तो अभिनेता सलमान खानच्या दबंग 2 चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी किच्चा सुदीप टीव्हीच्या जगात प्रसिद्ध होता. 'प्रेमदा कादंबरी' या मालिकेतून त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. 
 

Web Title: Actor Kiccha Sudeep's campaign for BJP, immediate threat; FIR lodged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.