अभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 02:27 IST2018-11-22T02:26:54+5:302018-11-22T02:27:13+5:30

चित्रपट अभिनेते अक्षयकुमार यांची पोलिसांच्या विशेष तपास पथकाने बुधवारी येथील पोलीस मुख्यालयात दीड तास चौकशी केली. पंजाबमध्ये गुरू ग्रंथ साहिबचा डेरा सच्चा सौदाच्या प्रेमींनी अपमान केल्याच्या प्रकरणात ही चौकशी होत आहे.

 Actor Akshay Kumar's SIT interrogation | अभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी

अभिनेते अक्षयकुमारची एसआयटीकडून चौकशी

- बलवंत तक्षक

चंदीगड : चित्रपट अभिनेते अक्षयकुमार यांची पोलिसांच्या विशेष तपास पथकाने बुधवारी येथील पोलीस मुख्यालयात दीड तास चौकशी केली. पंजाबमध्ये गुरू ग्रंथ साहिबचा डेरा सच्चा सौदाच्या प्रेमींनी अपमान केल्याच्या प्रकरणात ही चौकशी होत आहे.
बाबा गुरमित राम रहीम याला मी कधी भेटलेलो नाही, असे अक्षयकुमार यांनी चौकशीत सांगितले. राम रहीम याच्याशी काय संबंध आहेत आणि पंजाबचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्याशी राम रहीम याची भेट घालून दिल्याच्या आरोपाबद्दल एसआयटीने त्यांना अनेक प्रश्न विचारले. मुंबईतील आपल्या घरी अक्षयकुमार यांनी बादल व राम रहीम याची भेट घडवल्याचा आरोप असून तो त्यांनी नाकारला आहे.

Web Title:  Actor Akshay Kumar's SIT interrogation