दिल्लीत एकाने फेकले मैत्रिणीच्या अंगावर अॅसिड

By Admin | Updated: March 22, 2017 16:04 IST2017-03-22T16:02:07+5:302017-03-22T16:04:18+5:30

दिल्लीतील संगम विहार परिसरात एका व्यक्तीने आपल्या 20 वर्षीय मैत्रिणीच्या अंगावर अॅसिड फेकल्याची घटना घडली.

Acid on the body of a man thrown in Delhi | दिल्लीत एकाने फेकले मैत्रिणीच्या अंगावर अॅसिड

दिल्लीत एकाने फेकले मैत्रिणीच्या अंगावर अॅसिड

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 22 - दिल्लीतील संगम विहार परिसरात एका व्यक्तीने आपल्या 20 वर्षीय मैत्रिणीच्या अंगावर अॅसिड फेकल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रवि कुमार असे या आरोपीचे नाव आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास दिल्लीतील संगम विहार परिसरात त्याची मैत्रीण एका मुलांसोबत बोलत होती. त्यावेळी रवि कुमारने टॉयलेट साफ करण्यासाठी वापरण्यात येणारे अॅसिड तिच्या अंगावर फेकले. या घटनेनंतर त्याने पोलीस स्टेशन गाठले आणि झालेला प्रकार पोलिसांना सांगितला.
दरम्यान, पोलिसांनी रवि कुमारला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तर, पिडीत मैत्रिणीवर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
 
 

Web Title: Acid on the body of a man thrown in Delhi