शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

कोलकाता प्रकरण : आरोपी संजय रायचा सहकारी धावतच सीबीआयच्या ऑफिसमध्ये पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 19:36 IST

कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआयने एका व्यक्तीला चौकशीसाठी बोलावले होते.

Kolkata Rape-Murder Case:पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांसह सामान्य जनताही रस्त्यावर उतरली आहे. पश्चिम बंगालमध्ये या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी संजय रॉय याला अटक केली होती. त्यानंतर आता याप्रकरणाशी संबधित एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या नाट्यमय व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयचा जवळचा सहकारी सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेच्या कार्यालयाकडे चौकशीसाठी धावत असल्याचे दिसून आले आहे. रॉयचा सहकारी सीबीआय कार्यालयाच्या इमारतीच्या दिशेने धावत असताना मागून त्याच्यामागून आलेल्या एका पत्रकाराने त्याला विचारले की तो रॉयला किती दिवसांपासून ओळखतो. यावर त्याने प्रतिसाद न देता पळतच सीबीआयच्या कार्यलयाची इमारत गाठली.

कोलकाता पोलीस दलातील एएसआय अनुप दत्ता माध्यमांचे प्रश्न टाळण्यासाठी धावत सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले. सीबीआयने दिलेल्या समन्सला उत्तर देण्यासाठी अनुप दत्ता कार्यालयात आले होते. महिला डॉक्टरच्या हत्येच्या रात्री आरोपी संजय रॉयने अनुप दत्ताला फोन केला होता. दत्ता हा रॉय याचा निकटवर्तीय असल्याचेही म्हटलं जात आहे.

आरोपी संजय रॉय याच्यावर ३१ वर्षीय द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप आहे. ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पीडितेचा मृतदेह सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संजय रॉयला अटक करण्यात आली. हॉस्पिटलमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रॉय हा गुन्ह्याच्या दिवशी पहाटे ४ वाजता ब्लूटूथ डिव्हाइस घालून हॉस्पिटलच्या आपत्कालीन इमारतीत प्रवेश करताना दिसत होता. त्यानंतर रॉय ४० मिनिटांनंतर तिथून बाहेर पडताना दिसला. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभागPoliceपोलिस