शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:40 IST

याप्रकरणी वसंतकुंज (नॉर्थ) पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, आरोपी स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार असल्याचे समोर आले आहे.

दिल्लीतील वसंतकुंज येथील एका आश्रमाचे संचालक स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यांच्यावर सुमारे 17 विद्यार्थिनींशी छेडछाड आणि यौन शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वसंतकुंज (नॉर्थ) पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, आरोपी स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार असल्याचे समोर आले आहे.

खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो कार जप्त -दरम्यान, आरोपी स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांची कथित व्हॉल्वो कार पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवर बनावट 39 UN 1 ही राजनयिक नंबर प्लेट आढळली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आश्रम प्रशासनाने आरोपीला पदावरून हटवले आहे. दिल्ली पोलीस आरोपीच्या शोधासाठी अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. आरोपीचे शेवटचे लोकेशन आगरा येथे आढळले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात आहे. तसेच, पीडित विद्यार्थिनींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

विद्यार्थिनींवर लैंगिक शोषणाचा आरोप -दिल्ली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट रोजी वसंतकुंज नॉर्थ पोलीस ठाण्यात श्रीशृंगेरी मठ आणि त्याच्या मालमत्तांचे प्रशासक पीए मुरली यांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमध्ये EWS स्कॉलरशिप अंतर्गत PGDM (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट) अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थिनींवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

महिला प्राध्यापकांवरही आरोप --तपासादरम्यान, 32 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले, त्यापैकी 17 जणींनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांनी शिवीगाळ, अश्लील व्हॉट्सअॅप मेसेज, एसएमएस आणि अयोग्य पद्धतीने संपर्क ठेल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर, संस्थेत प्राध्यापक आणि प्रशासनात काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्यावर आरोपीच्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव टाकल्याचा, आरोपही करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Swami Chaitanyanand Saraswati accused of molestation, absconding; Volvo seized

Web Summary : Swami Chaitanyanand Saraswati faces molestation charges involving 15 students in Delhi. He's absconding; his Volvo car with a fake plate has been seized. Allegations include sexual harassment and inappropriate contact.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थी