भाजपाची बी टीम असल्याचा आरोप, काँग्रेसने या मित्रपक्षाला यूपीएमधून हाकलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 05:27 PM2023-01-11T17:27:59+5:302023-01-11T17:28:29+5:30

Congress News: काँग्रेस पक्षाने आसाममधील आपला सहकारी पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) या पक्षाला यूपीएमधून हाकलले आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी याची घोषणा केली आहे.

Accused of being BJP's B team, Congress expelled AIUDF from UPA | भाजपाची बी टीम असल्याचा आरोप, काँग्रेसने या मित्रपक्षाला यूपीएमधून हाकलले

भाजपाची बी टीम असल्याचा आरोप, काँग्रेसने या मित्रपक्षाला यूपीएमधून हाकलले

googlenewsNext

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाने आसाममधील आपला सहकारी पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) या पक्षाला यूपीएमधून हाकलले आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी याची घोषणा केली आहे. त्यांनी आसाममधील एआययूडीएफ हा पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा आरोप केला. एआययूडीएफचे अध्यक्ष बदरुद्दीज अजमल यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत साटेलोटे केले होते, असा दावा जयराम रमेश यांनी केला. 
काँग्रेसने बदरुद्दीन अजमल यांच्या कथित विधानावरून त्यांच्यावर जोरदार पटलवार केला. तसेच त्यांचा पक्ष हा असदुद्दीन ओवैसींच्या एआयएमआयएम प्रमाणेच भाजपाचं मुखपत्र आहे, असा टोला लगावला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, अजमल कुठलाही दावा करो. मात्र आता त्यांचं संयुक्त पुरोगामी आघाडीशी(यूपीए) काहीही देणंघेणं नाही आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार अजमल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केला होता. आसाममधील काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांच्याकडून रात्रीच्या वेळी पाकीट घेतात, असा आरोप अजमल यांनी केला होता. त्यानंतर जयराम रमेश यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, खासदार बदरुद्दीन अजमल यांनी आसाममध्ये काँग्रेस नेतृत्वाविरोधात संपूर्णपणे अस्वीकारार्ह आणि संतापजनक विधान केले आहे. हे विधान अत्यंत अपमानास्पद आहे.

जयराम रमेश पुढे म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि एआययूडीएफ हे पक्ष एकत्र आघाडी करून लढले होते. ही आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेससाठी सोपा नव्हता. मात्र अजमल हे विश्वासपात्र सहकारी ठरतील आणि देशात धर्मनिरपेक्ष शक्तींना बळकट करतील, असे काँग्रेसला वाटले होते.

अजमल यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने काम केले होते आणि काँग्रेस आणि काँग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्याच्या हेतूने ही आघाडी केली होती, असा आरोपही जयराम रमेश यांनी केला.  
 

Web Title: Accused of being BJP's B team, Congress expelled AIUDF from UPA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.