शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

२७ वर्षापासून फरार आरोपीस अटक

By admin | Updated: January 30, 2016 00:17 IST

विशेष अभियान : लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

विशेष अभियान : लोहमार्ग पोलिसांची कामगिरी
नागपूर : अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. मोहिमेंतर्गत मागील दोन दिवसात २६ ते २७ वर्षांपासून फरार असलेल्या २ आरोपींना अटक करण्यात यश प्राप्त झाले आहे.
लोहमार्ग पोलिसांनी फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत ललित कांतीलाल व्यास (५८) रा. नेताजीनगर कळमना नागपूर या आरोपीस २६ वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. त्याने १९९० मध्ये एका शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेंव्हापासून तो फरार होता. दरम्यान तो नागपुरातून वर्धा शहरात राहण्यासाठी गेल्याची गुप्त माहिती लोहमार्ग पोलिसांना समजली. त्यानुसार त्यास २६ वर्षानंतर वर्धा शहरातून अटक करण्यात आली. दुसऱ्या घटनेत आरोपी कुणाल विठोबा उरकुडे (४५) रा. हेलोडी ता. सेलू जि. वर्धा या आरोपीला अटक करण्यात आली. चोरी केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध १९८९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला सेलू तालुक्यातील हेलोडी येथून त्याच्या राहत्या घरून अटक करण्यात आली. तब्बल २७ वर्षानंतर या आरोपीस पकडण्यात लोहमार्ग पोलिसांना यश मिळाले. ही कारवाई लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उप निरीक्षक खुशाल शेंडगे, रविंद्र सावजी, विनोद नांदे यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)
..................