शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

कठड्याअभावी वाढले अपघात

By admin | Updated: May 25, 2015 02:11 IST

वडगाव काशिंबेग बंधारा रस्ता धोकादायक

वडगाव काशिंबेग बंधारा रस्ता धोकादायक
मंचर : वडगाव काशिंबेग (ता.आंबेगाव) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचा साकोरे बाजूकडील भाग धोकादायक बनला आहे. येथे सुरक्षिततेसाठी कठडा नसल्याने अनेक वाहने बंधार्‍यात कोसळली आहेत.
घोडनदीवर वडगाव काशिंबेग येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधार्‍यावरून दुचाकी वाहने ये-जा करीत असतात. येथे पूल व्हावा, अशी ग्रामस्थांची अनेक दिवसांची मागणी आहे. वडगावमार्गे बंधार्‍यावरुन साकोरे महाळुंगे पडवळ येथील नागरिक ये-जा करतात. हा नजीकचा मार्ग असल्याने या गावातील नागरिकांची सतत वर्दळ असते.
कोल्हापूर पद्धतीच्या या बंधार्‍याला दोन्ही बाजूला संरक्षक कठडे आहेत. मात्र, साकोरे गावच्या बाजूला धोकादायक स्थिती आहे. बंधारा संपल्यानंतर येथे अरुंद रस्ता होतो. तेथून दुचाकी गाडी पुढे काढणे जिकिरीचे बनते. शिवाय घोडनदी पाणीसाठा असलेल्या बाजूला संरक्षक भिंत नाही. साकोरे गावाच्या बाजूने वाहने आली की त्यांना बंधार्‍यावर येण्यासाठी वळावे लागते. मात्र, तेथेच कुठलीही सुरक्षा नसल्याने वाहनचालक वाहनांसह बंधार्‍यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
पावसाळ्यात हा रस्ता अधिकच धोकादायक बनतो. साकोरे बाजूच्या या वळणावर वाहने चालविणे अवघड बनले आहे. बंधार्‍याच्या या भागात भर टाकून संरक्षक कठडे बसविण्याची मागणी सरपंच विनोद मोढवे व श्रीकृष्ण पतसंस्थेचेे तज्ज्ञ सल्लागार महेश डोके यांनी केली आहे.

फोटो : घोडनदीवरील वडगाव काशिंबेग येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावर साकोरे बाजूकडील भाग धोकादायक बनला आहे.