केटरिंगचे काम करून परतताना अपघात; ९ कामगारांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 05:21 IST2024-02-22T05:21:14+5:302024-02-22T05:21:39+5:30
लखीसरायचे पोलिस अधीक्षक पंकज कुमार

केटरिंगचे काम करून परतताना अपघात; ९ कामगारांचा मृत्यू
लखीसराय : लग्नसमारंभातील केटरिंगचे काम करून परतणाऱ्या कामगारांच्या रिक्षाला ट्रकने दिलेल्या धडकेत ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाचजण जखमी झाले. बिहारच्या लखीसराय-सिकंदरा मार्गावरील बिहारौरा गावात ही घटना घडली.
रिक्षातून सुमारे १५ कामगार प्रवास करत होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने ९ जणांचा मृत्यू झाला. वीर पासवान, विकास कुमार, विजय कुमार, दिबाना पासवान, अमित कुमार, मोनू कुमार, किशन कुमार आणि मनोज गोस्वामी अशी मृतांची नावे आहेत. यातील बहुतांश लोक मुंगेरचे रहिवासी होते.
लखीसरायचे पोलिस अधीक्षक पंकज कुमार यांनी सांगितले की, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ जणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.