विरुद्ध दिशेने येणार्या दुचाकींची भीषण धडक झाली. उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये ही घटना घडली असून, यात एकाचा जागीच मृत्यू झाला. मयत व्यक्ती सेंच्युरी फॅक्टरीमध्ये कामाला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ही घटना थरकाप उडवणारी आहे.
दीपक शर्मा असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो उपेडाचा रहिवाशी होता. हापुडमधील सेंच्युरी फॅक्ट्रीमध्ये काम करणारा दीपक शर्मा रविवारी सुट्टीवर होता.
शेतातील पिकांसाठी किटकनाशक आणण्यासाठी दीपक शर्मा बाबूगड छावणी येथे जात होता. बाबूगड वळणावर आल्यानंतर त्याच्या दुचाकीला समोरून वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाकीवरील तिघेही हवेत उडाले आणि त्यानंतर दूर जाऊन पडले.
घटनेनंतर परिसरातील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तिघांनाही रुग्णालयात दाखल केले. हापुड येथील रुग्णालयात डॉक्टरांनी दीपक शर्माला मृत घोषित केले.