Accident: डिव्हायडरवर आदळून कार उलटली, भीषण अपघातात काँग्रेस नेत्याच्या मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 17:32 IST2022-08-01T17:32:27+5:302022-08-01T17:32:49+5:30
Accident: तेलंगाणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघातात काँग्रेस नेत्याच्या मुलीचा मृत्यी झाला आहे. कारला झालेल्या या अपघातातून कारमधून प्रवास करणारे दोघेजण बालंबाल बचावले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Accident: डिव्हायडरवर आदळून कार उलटली, भीषण अपघातात काँग्रेस नेत्याच्या मुलीचा मृत्यू
हैदराबाद - तेलंगाणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघातातकाँग्रेस नेत्याच्या मुलीचा मृत्यी झाला आहे. कारला झालेल्या या अपघातातून कारमधून प्रवास करणारे दोघेजण बालंबाल बचावले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शमशाबाद रंगा रेड्डी जिल्ह्यातील राजेंद्रनगर भागातील एक विभाग आहे. येथील काँग्रेसचे नेते फिरोज खान यांची कन्या तानिया काकडे (२५) शमशाबाद विमानतळ रोडवरून तिच्या आय-२० या कारमधून जात होती. यादरम्यान, झालेल्या भीषण अपघातात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, ही कार रस्त्यावरील दुभाजकावर आदळून उलटल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. कारमध्ये अजून दोन लोक होते. मात्र ते बचावले. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. मात्र तानिया काकडे हिचा मृत्यू झाला.
शमशाबादच्या एसीपींनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी १२.०५ च्या सुमारास शमशाबाद रोडवर एक आय-२- कार डिव्हायडरवर आदळून उलटली. या अपघातात तानिया नावाच्या मुलीला गंभीर दुखापत झाली. तिला त्वरित उस्मानिया रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, कार चालकाचं नाव अली मिर्झा असं असल्याचं समोर आलं आहे. अपघात झाला तेव्हा कारमध्ये दीया नावाची अन्य एक तरुणीही होती. या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.