चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:10 IST2025-08-08T15:09:35+5:302025-08-08T15:10:29+5:30

उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये मुसळधार पावसात एक दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या रोडवेज बसवर एक मोठं झाड कोसळलं.

accident amid heavy rain in barabanki tree fell on roadways bu three people died | चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"

चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"

उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये मुसळधार पावसात एक दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या रोडवेज बसवर एक मोठं झाड कोसळलं. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. झाड पडण्याच्या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी जाऊन बचावकार्य केलं आणि रस्ता मोकळा केला.

बसवर झाड कोसळल्यानंतर लोकांनी बसमध्ये अडकलेल्या एका महिला प्रवाशाचा व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. यावर ती म्हणाली, "आमच्या आयुष्याचा, जीवन-मृत्यूचा प्रश्न आहे आणि तुम्ही व्हिडीओ बनवत आहात, जर तुम्ही येऊन झाडाची फांदी काढण्यास मदत केली असती तर आम्ही बाहेर आलो असतो" त्यानंतर गर्दीने व्हिडीओ शूट करणाऱ्या मुलाला तेथून बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, बाराबंकी-हैदरगड रस्त्यावरील हरख राजा बाजारजवळ ही दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस येथून जात असताना झाड तिच्यावर कोसळलं. यानंतर घटनास्थळी खूप आरडाओरड झाली. जीव वाचवण्यासाठी लोक बसच्या खिडकीतून उड्या मारताना दिसले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे आतापर्यंत पाच जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. झाड तोडून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. पावसात झालेल्या दुर्घटनेमुळे मदत आणि बचावकार्याला वेळ लागला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बस बाराबंकीहून हैदरगडला जात होती. अपघातात चालकासह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला.
 

Web Title: accident amid heavy rain in barabanki tree fell on roadways bu three people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.