मुंबईकडे येणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग; खिडक्या फोडून प्रवाशांना सुखरूप काढलं बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 15:16 IST2023-12-15T15:13:38+5:302023-12-15T15:16:03+5:30
प्रवाशांमध्ये घबराट, पण वेळीच बचावकार्य केल्याने सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईकडे येणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग; खिडक्या फोडून प्रवाशांना सुखरूप काढलं बाहेर
Pawan Express Train Fire: बिहारमधील मधुबनी येथील जयनगर येथून मुंबईकडे येणाऱ्या पवन एक्स्प्रेसच्या वातानुकुलित (AC) टू टायर डब्याला आग लागली. आग लागल्याचे समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधनामुळे शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग वेळीच आटोक्यात आली आहे. या गाडीची सुटण्याची वेळ 1 वाजता होती. खिडकी तोडून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बोगीतून बाहेर आल्यानंतर प्रवाशांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मात्र वेळीच बचावकार्य सुरू झाल्याने प्रवाशांनी साऱ्यांचे आभार मानले.
#WATCH | Fire breaks out in an AC coach of Pawan Express train at Jaynagar in Bihar's Madhubani; no casualties reported in the incident pic.twitter.com/QwnULqdCUi
— ANI (@ANI) December 15, 2023
पवन एक्सप्रेस ही ट्रेन मुंबईच्या दिशेने जाते आणि जयनगरला पोहोचल्यावर प्लॅटफॉर्मवर उभी राहते. जयनगरमध्ये फक्त पाणी भरणे आणि साफसफाई केली जाते. त्यानंतर मूळ धुलाई व स्वच्छता मुंबईत होते. आज मधुबनी येथे या रेल्वेच्या वातानुकुलित डब्ब्याला आग लागली. सध्या घटनेनंतर विद्युत तपासणी झाली की नाही, याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.