परदेश दौरा, विपश्यना, ध्यान; राहुल गांधींना थंडी न लागण्यामागचे अखेर कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 07:33 IST2023-01-08T07:33:39+5:302023-01-08T07:33:58+5:30

अलीकडेच दिल्लीत झालेल्या पत्रपरिषदेत राहुल गांधी यांनी सांगितले की, मला थंडीची भीती वाटत नाही.

Abroad tour, vipassana, meditation; The reason behind Congress MP Rahul Gandhi not getting cold has finally come to light | परदेश दौरा, विपश्यना, ध्यान; राहुल गांधींना थंडी न लागण्यामागचे अखेर कारण आले समोर

परदेश दौरा, विपश्यना, ध्यान; राहुल गांधींना थंडी न लागण्यामागचे अखेर कारण आले समोर

- आदेश रावल

नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेवर निघालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी एवढ्या थंडीतही केवळ टी-शर्ट घालत आहेत, याची सर्वत्र चर्चा आहे. हे कसे शक्य आहे, याबाबत प्रत्येकाला उत्सुकता आहे.

अलीकडेच दिल्लीत झालेल्या पत्रपरिषदेत राहुल गांधी यांनी सांगितले की, मला थंडीची भीती वाटत नाही. त्यामुळे मी टी-शर्ट घालतो. 
लोकमतने याचे रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक दिवस माहिती घेतली, तेव्हा कळाले की, राहुल गांधी जेव्हा विदेशात जातात तेव्हा अनेक तास विपश्यना करतात. दोन आठवड्यांच्या कार्यक्रमात दररोज सुमारे १० तास ध्यान करावे लागते. बँकॉकजवळील एका केंद्रामध्ये राहुल गांधी दरवर्षी जातात. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना हरियाणाच्या सोनिपतजवळील विपश्यना केंद्रात पाठवण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची विपश्यना सुरू आहे.

Web Title: Abroad tour, vipassana, meditation; The reason behind Congress MP Rahul Gandhi not getting cold has finally come to light