सुमारे ५०० भारतीय थायलंडमध्ये दाखल; मायदेशी आणण्यासाठी विमान पाठवण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:28 IST2025-10-30T12:25:50+5:302025-10-30T12:28:28+5:30

भारत आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी थायलंडला विमान पाठवण्याचा विचार करत असल्याचे कळते

About 500 Indians arrive in Thailand Planning to send plane to bring them back home | सुमारे ५०० भारतीय थायलंडमध्ये दाखल; मायदेशी आणण्यासाठी विमान पाठवण्याचा विचार

सुमारे ५०० भारतीय थायलंडमध्ये दाखल; मायदेशी आणण्यासाठी विमान पाठवण्याचा विचार

नवी दिल्ली : म्यानमारमधील फसवणूक करणाऱ्या काही केंद्रांवर कारवाई झाल्यानंतर, सुमारे ५०० भारतीय थायलंडमध्ये दाखल झाले आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताची थायलंडच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.

भारत आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी थायलंडला विमान पाठवण्याचा विचार करत असल्याचे कळते. यापैकी बहुतेक भारतीय म्यानमारच्या केके पार्क कॉम्प्लेक्समधील फसवणूक करणाऱ्या केंद्रांचे बळी होते.

थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल म्हणाले की, सुमारे ५०० भारतीय पश्चिम थायलंडमधील माई सोत येथे आहेत. त्यांना परत नेण्यासाठी भारत सरकार विमान पाठवणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, ५०० भारतीय गेल्या काही दिवसांत म्यानमारमधून थायलंडमध्ये दाखल झाले. थायलंडमधील आमचे मिशन त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी करण्यासाठी आणि थायलंडमध्ये आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांना परत पाठवण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत काम करीत आहे. थायलंडच्या अधिकाऱ्यांसोबत काम करत आहेत.

म्यानमारमधून पळून गेलेल्या २८ देशांतील १,५०० हून अधिक लोकांमध्ये हे भारतीय नागरिक आहेत. म्यानमारची केंद्रे आंतरराष्ट्रीय सायबर घोटाळ्यांमध्ये सहभागी आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, विविध देशांतील शेकडो तस्करी पीडितांना या केंद्रांवरील कारवायांमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले गेले. कंबोडिया, लाओस, फिलिपिन्स आणि मलेशियामध्येही अशाच प्रकारच्या कारवाया झाल्याचे वृत्त आहे.

मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात असे म्हटले आहे की, भूमिगत कारवाया बहुतेकदा अशा गुन्हेगारी नेटवर्कशी जोडल्या जातात जे जागतिक स्तरावर लोकांना भरती करतात आणि त्यांना प्रामुख्याने कंबोडिया, म्यानमार, लाओस, फिलिपिन्स आणि मलेशियामध्ये असलेल्या केंद्रांमध्ये कामावर ठेवतात. मार्चमध्ये, भारताने म्यानमार थायलंड सीमेवर असलेल्या सायबर स्कॅम केंद्रांमधून सुटका केलेल्या ५४९ नागरिकांना मायदेशी परत आणले होते.
 

Web Title : थाईलैंड में 500 भारतीय: भारत द्वारा स्वदेश वापसी उड़ान पर विचार

Web Summary : म्यांमार धोखाधड़ी केंद्रों पर कार्रवाई के बाद 500 भारतीय थाईलैंड में हैं। भारत वापसी उड़ान पर विचार कर रहा है। अधिकांश म्यांमार के केके पार्क परिसर से पीड़ित थे। वे म्यांमार घोटाले केंद्रों से भागकर आए 28 देशों के 1,500 लोगों में शामिल हैं। भारत थाई अधिकारियों के साथ काम कर रहा है।

Web Title : 500 Indians in Thailand: Repatriation Flight Considered by India

Web Summary : Following action against Myanmar fraud centers, 500 Indians are now in Thailand. India is considering a repatriation flight. Most were victims from Myanmar's KK Park complex. They are among 1,500 people from 28 countries who fled Myanmar scam centers. India is working with Thai authorities.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.