शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १२ हजार कोटी थकले

By admin | Updated: February 19, 2015 00:22 IST

आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या गळीत हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत साखर उत्पादन १५ टक्क्यांनी वाढून १.६७ कोटी टन झाले आहे.

नवी दिल्ली : आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या गळीत हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत साखर उत्पादन १५ टक्क्यांनी वाढून १.६७ कोटी टन झाले आहे. तथापि, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या थकबाकीचा आकडा १२,३०० कोटींवर गेला आहे.भारतीय साखर कारखाना संघाच्या (इस्मा) माहितीनुसार मागच्या वर्षात भारतात याच अवधीत ४५.२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाच्या विपणन वर्षात (२०१४-१५ आॅक्टोबर ते सप्टेंबर) साखरेचे उत्पादन २.६ कोटी टन होईल, असा अंदाज इस्माने मागच्या महिन्यात व्यक्त केला होता. मागच्या वर्षात (२०१३-१४) साखरेचे उत्पादन २.४३ कोटी टन झाले होते. इस्माने जारी केलेल्या निवेदनानुसार ५१८ साखर कारखान्यांत १५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत १६७.०८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात या अवधीपर्यंत ४२.२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले .ब्राझीलनंतर भारत हा जगातील सर्वांत दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे.महाराष्ट्रात मागच्या वर्षात ४९.८ लाख साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाच्या हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात ६५ लाख टन उत्पादन झाले असून कर्नाटकात २८.२ लाख टन उत्पादन झाले आहे. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या भावानुसार १२,३०० कोटी रुपये थकले आहेत. हीच स्थिती कायम राहिल्यास थकीत बिलाचा आकडा १३,००० कोटींवर जाईल. दरवर्षी मार्चअखेर थकीत बिलाचा आकडा वाढलेला असतो.