शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मित्रानंच काढले अब्रूचे धिंडवडे, स्वतःसमोरच मैत्रिणीवर करायला लावला बलात्कार, व्हिडीओही केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 12:04 IST

तरुणीवर तिच्याच मित्राने हल्ला करत मित्रांच्या मदतीने बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आरोपीने तरुणीची छेड काढत बलात्काराचा प्रयत्न करत असल्याचं कृत्य मित्रांच्या मदतीने मोबाइलमध्ये कैद केलं.

ठळक मुद्देतरुणीवर तिच्याच मित्राने हल्ला करत मित्रांच्या मदतीने बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आरोपीने तरुणीची छेड काढत बलात्काराचा प्रयत्न करत असल्याचं कृत्य मित्रांच्या मदतीने मोबाइलमध्ये कैद केलंपोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली

विशाखापट्टणम - तरुणीवर तिच्याच मित्राने हल्ला करत मित्रांच्या मदतीने बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आरोपीने तरुणीची छेड काढत बलात्काराचा प्रयत्न करत असल्याचं कृत्य मित्रांच्या मदतीने मोबाइलमध्ये कैद केलं. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. आंध्रप्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. 

आरोपींनी व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तरुणीवर अमानुषपणे अत्याचार करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. तरुणी वारंवार दयेची भीक मागत पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र आरोपी तरुण वारंवार तिला खेचत तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पीडित तरुणीवर बलात्काराची प्रयत्न होताना दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत असणारी दुसरी तरुणी मध्यस्थी करत सुटका करण्याचा प्रयत्न करते. मात्र आरोपी तिलाही हटकून देत आपलं पाशवी कृत्य सुरु ठेवतो. 

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितलं आहे की, पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण आरोपी बी साई याला भेटण्यासाठी मंदिरात आल्या होत्या. पीडित तरुणी आरोपीला गेल्या एक वर्षापासून ओळखत होती. घटनेमुळे मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने कुठेही घटनेची वाच्यता केली नाही. मात्र व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाला असून तो व्हायरल होत असल्याचं कळल्यानंतर तिने कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. यानंतर पीडित तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. 

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. आरोपी तरुणांमध्ये कार्तिक नावाचा एक तरुणदेखील आहे. पीडित तरुणीची त्याच्याशीही मैत्री होती. 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, पीडित तरुणीची दुस-या तरुणासोबत झालेली मैत्री कार्तिकला खटकत होती. संतापलेल्या कार्तिकनेच आपला मित्र बी साईला पीडित तरुणीसोबत हे कृत्य करण्यासाठी उसकावलं होतं. आरोपींमधील एक तरुण कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दुसरा तरुण ग्रॅज्यूएट आहे. 

अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र त्यासाठी जागरुकता असणंही तितकंच गरजेचं आहे. अशा घटनांची माहिती मिळताच पोलिसांना कळवलं, तर व्हिडीओ व्हायरल होण्यापासून थांबवता येऊ शकतो असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे